वेगवेगळ्या नोटांवर का दिलेल्या असतात या तिरप्या रेषा? काय आहे यांचा अर्थ आणि महत्व?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 04:55 PM2022-03-19T16:55:38+5:302022-03-19T16:57:35+5:30

Indian Currency : वेगवेगळ्या नोटांवरील रेषा नोटांबाबत महत्वपूर्ण माहिती देतात. चला जाणून घेऊ १००, २००, ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांवर असलेल्या या लाईन्सचा अर्थ काय होतो.

Indian currency notes have lines on it, Know what is means | वेगवेगळ्या नोटांवर का दिलेल्या असतात या तिरप्या रेषा? काय आहे यांचा अर्थ आणि महत्व?

वेगवेगळ्या नोटांवर का दिलेल्या असतात या तिरप्या रेषा? काय आहे यांचा अर्थ आणि महत्व?

googlenewsNext

Indian Currency : भारतात काही वर्षांपासून नव्या नोटांचं चलन सुरू झालं आहे. या नोटा रंगीत आणि अधिक आकर्षक करण्यात आल्या आहेत. यावर सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळे फीचर्स असतात. या नोटांवर तुम्ही कधी बघितलं असेल की, नोटांच्या एका कोपऱ्यात तिरप्या रेषा असतात. नोटांच्या किंमतीच्या हिशोबाने या रेषांची संख्या वाढत जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, नोटांवर या रेषा का दिलेल्या असतात? 

वेगवेगळ्या नोटांवरील रेषा नोटांबाबत महत्वपूर्ण माहिती देतात. चला जाणून घेऊ १००, २००, ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांवर असलेल्या या लाईन्सचा अर्थ काय होतो.

काय म्हणतात या रेषांना?

नोटांवर बनलेल्या या रेषांना 'ब्लीड मार्क्स' असं म्हणतात. हे ब्लीड मार्क्स खासकरून नेत्रहीन व्यक्तींसाठी तयार केलेले असतात. नोटांवर असलेल्या रेषांना स्पर्श करून ते सांगू शकतात की, ही नोट किती रूपयांची आहे. याच कारणाने १००, २००, ५०० आणि २००० च्या नोटांवर वेगवेगळ्या संख्येत या रेषा असतात. यावरूनच नेत्रहीन नोटेची किंमत जाणून घेऊ शकतात.

चला एका नोटेच्या किंमतीवर नजर टाकू. १०० च्या नोटेवर दोन्ही बाजूने चार रेषा असतात. ज्यांना स्पर्श केल्यावर नेत्रहीन व्यक्तींना समजतं की, ही १०० रूपयांची नोट आहे. तेच २०० रूपयांच्या नोटेवर दोन्ही कॉर्नरला चार-चार रेषा असतात आणि दोन दोन शून्यही असतात. तेच ५०० च्या नोटेवर ५ आणि २००० च्या नोटेवर दोन्ही बाजूने ७-७ रेषा दिलेल्या आहेत. या रेषांच्या मदतीने नेत्रहीन व्यक्ती सहजपणे नोटांची आणि त्यांच्य किंमतीची ओळख पटवू शकतात.
 

Web Title: Indian currency notes have lines on it, Know what is means

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.