सुटाबुटात भारतीय नेते वेटर वाटतात - स्वामी
By admin | Published: June 24, 2016 01:39 PM2016-06-24T13:39:16+5:302016-06-25T04:30:03+5:30
सुब्रमण्यम स्वामींनी आता भाजपा नेत्यांनी विदेशात जाताना भारतीय कपड्यात जावं, कारण टाय व सूट घातलेल्या अवस्थेत ते वेटर वाटतात अशी टि्वप्पणी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - आधी रघुराम राजन, मग अरविंद सुब्रमणियन आणि नंतर पडद्याआड अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर शाब्दिक वार करणाऱ्या सुब्रमण्यन स्वामींनी आता भाजपा नेत्यांनी विदेशात जाताना भारतीय कपड्यात जावं, कारण टाय व सूट घातलेल्या अवस्थेत ते वेटर वाटतात अशी टि्वप्पणी केली आहे.
भाजपाचे नेते असलेले स्वामी नरेंद्र मोदी सोडले तर कुणाला जुमानत नसून आता तर त्यांनी उघड उघड जेटली यांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे. नेत्यांनी तोंडाला आवर घालावा आणि शिस्त पाळावी अन्यथा रक्ताचे पाट वाहतिल असा सूचक इशारा जेटलींनी दिला होता. यावर नाव न घेता, मी तोंड बंद ठेवलं तर रक्ताचे पाट वाहतिल अशी प्रतिक्रिया स्वामींनी व्यक्त केली आहे.
जेटली बँक ऑफ चायनाचे अध्यक्ष तिआन गिली यांना नुकतेच भेटले. त्यांचे सूट व टायमधले छायाचित्र प्रसिद्ध होताच, स्वामींनी भाजपाच्या नेत्यांनी विदेशात भारतीय पद्धतीचे कपडे घालावेत असे ट्विट केले आणि पुढे जात सूट व टायमध्ये भारतीय नेते वेटर वाटतात असेही म्हटले.
BJP should direct our Ministers to wear traditional and modernised Indian clothes while abroad. In coat and tie they look like waiters
— Subramanian Swamy (@Swamy39) June 24, 2016
People giving me unasked for advice of discipline and restraint don't realise that if I disregard discipline there would be a blood bath
— Subramanian Swamy (@Swamy39) June 24, 2016