याला म्हणतात नशीब! UAE मध्ये मालामाल झाला भारतीय ड्रायव्हर; जिंकले 45 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 01:12 PM2024-01-04T13:12:39+5:302024-01-04T13:14:00+5:30

नवीन वर्षाची सुरुवात मुनव्वरसाठी खूप खास झाली आहे. आपल्या नावाने त्याने जे लॉटरीचं तिकीट घेतलं होतं, त्यासाठी 30 जणांनी मिळून पैसे दिले होते.

indian man wins 45 crore rupees lottery in uae works as driver in dubai | याला म्हणतात नशीब! UAE मध्ये मालामाल झाला भारतीय ड्रायव्हर; जिंकले 45 कोटी

याला म्हणतात नशीब! UAE मध्ये मालामाल झाला भारतीय ड्रायव्हर; जिंकले 45 कोटी

UAE मध्ये राहणाऱ्या एका भारतीयाचे नशीब एका क्षणात बदललं. ज्यावर त्याचा स्वतःचा आता विश्वास बसत नाही. ही व्यक्ती सध्या दुबईत राहते आणि ड्रायव्हर म्हणून काम करते. त्याने 45 कोटी रुपये जिंकले आहेत. मुनव्वर फिरोज असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने येथे लॉटरी जिंकली आहे. 31 डिसेंबर रोजी बिग तिकिट लाईव्ह ड्रॉमध्ये 20 मिलियन UAE दिरहमचे जॅकपॉट बक्षीस जिंकलं आहे. 

नवीन वर्षाची सुरुवात मुनव्वरसाठी खूप खास झाली आहे. आपल्या नावाने त्याने जे लॉटरीचं तिकीट घेतलं होतं, त्यासाठी 30 जणांनी मिळून पैसे दिले होते. आता जिंकलेली रक्कम या सर्व लोकांमध्ये वाटली जाईल. खलीजा टाईम्सच्या वृत्तानुसार, मुनव्वर हा बिग तिकिटाचा ग्राहक आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो दर महिन्याला लॉटरीची तिकिटे खरेदी करत आहे. 

मुनव्वर म्हणाला की, लॉटरी जिंकली आहे यावर अजूनही विश्वास बसत नाही. खर सांगू, मला असं होईल अशी अपेक्षा नव्हती, त्यामुळे मला अजून खात्री नाही. मला अजूनही यावर विश्वास बसत नाही आणि काही काळ माझ्या पर्यायांचा विचार करावा लागेल. मुनव्वर व्यतिरिक्त, इतर दहा विजेत्यांना प्रत्येकी 22 लाख रुपये मिळाले आहेत. 

यामध्ये भारतीय, पॅलेस्टिनी, लेबनीज आणि सौदी अरेबियाच्या नागरिकांचा समावेश आहे. यूएईमध्ये आणखी अनेक भारतीयांनी लॉटरी जिंकली आहे. 31 डिसेंबर रोजी सुथेश कुमार कुमारेसन नावाच्या भारतीय व्यक्तीनेही लॉटरी जिंकली. त्याला सुमारे दोन कोटी रुपये मिळाले आहेत. सुथेश एतिहाद एअरवेजमध्ये इंजिनिअर असून अबुधाबीमध्ये राहतो.
 

Web Title: indian man wins 45 crore rupees lottery in uae works as driver in dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा