दुबईत राहणार्या भारतीयाचे उघडले नशीब, लकी ड्रॉमध्ये जिंकले 21 लाख!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:39 PM2022-07-05T14:39:34+5:302022-07-05T14:41:26+5:30
Mahzooz Draw : भाग्यवान विजेत्यांना एक लाख दिरहम मिळाले, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 21 लाख 48 हजार रुपये आहे.
दुबई : संयुक्त अरब अमिरातीतील महजूझ विकली ड्रॉचा विजेता रातोरात करोडपती बनला आहे. पहिल्या विजेत्याने 1 कोटी दिरहम जिंकले आहेत, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 21 कोटी आहे. याशिवाय, आणखी अनेक जण विजेते ठरले, त्यात एका भारतीयाचाही समावेश आहे. महजूझ विकली ड्रॉमध्ये, भाग्यवान बक्षीस विजेत्याचे सर्व पाच नंबर जुळले. हे नंबर 1, 8, 10, 12 आणि 49 होते.
83 व्या आठवड्याच्या विकली ड्रॉमध्ये 1,407 इतर विजेते झाले. ज्यांना एकूण 1,781,600 दिरहम पुरस्कार देण्यात आले. 28 विजेते होते, ज्यांना चार अंक मिळाले. तो दुसऱ्या नंबरवर होता. दुसऱ्या विजेत्याची बक्षीस रक्कम 10 लाख दिरहम म्हणजे जवळपास 2 कोटी 24 लाख रुपये होती. या सर्वांमध्ये 35,714 दिरहम वितरित केले गेले, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 7,67,369 रुपये आहे.
विजेत्यांपैकी एक भारतीय
गॅरंटीड रॅफल ड्रॉमध्ये तीन सहभागींमध्ये तीन लाख दिरहम समान प्रमाणात वितरीत करण्यात आले. भाग्यवान विजेत्यांना एक लाख दिरहम मिळाले, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 21 लाख 48 हजार रुपये आहे. या तीन विजेत्यांपैकी एक भारतीय देखील आहे. भारताचा अनिश, कॅनडाचा तारेक आणि पाकिस्तानचा राजा हे विजेते ठरले. महजूजच्या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी पाण्याची बाटली खरेदी करावी लागते.
असा होऊ शकेल सहभाग
खलीज टाईमनुसार, महजूझ लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी www.mahzooz.ae वर नोंदणी करावी लागेल आणि येथून 35 दिरहम अंदाजे 750 रुपयांची पाण्याची बाटली खरेदी करावी लागेल. एक बाटली खरेदी केल्याने ग्रँड ड्रॉ आणि दुसरी बाटली विकत घेतल्यास राफेल ड्रॉमध्ये प्रवेश मिळेल, ज्यामुळे जिंकण्याची शक्यता वाढते. पहिले बक्षीस 1 कोटी दिरहम आणि दुसरे बक्षीस 10 लाख दिरहम आहे.