Google वर आता कोरोना नाही 'या' गोष्टी सर्च करताहेत लोक, मे महिन्यात असा काही बदलला लोकांचा मूड!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:46 PM2020-06-09T14:46:53+5:302020-06-09T15:00:34+5:30
गुगल सर्च ट्रेड्सनुसार कोविड-19 संबंधित सर्च एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात साधारण अर्धे राहिले. पण दुसरीकडे देशात कोरोनाच्या केसेस वाढतच आहेत.
गुगलच्या नुकत्याच आलेल्या सर्च ट्रेन्डवरून लोकांच्या मूडबाबत जाणून घेता येतं. अनेक आठवडे लोकांमध्ये चर्चेत राहिल्यानंतर आता कोरोना व्हायरसबाबत जाणून घेण्याची लोकांची इच्छा कमी झालेली दिसते. गुगल मे महिन्यात कोरोना व्हायरससंबंधी माहिती सर्च करण्याचं प्रमाण कमी झालंय.
लोक आता पुन्हा सिनेमे, गाणी आणि हवामानाच्या माहितीकडे वळत आहेत. मे महिन्यात गुगलवर सर्वात जास्त लॉकडाऊन 4.0 बाबत माहिती सर्च केली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 'ईद मुबारक' होतं.
कोरोना व्हायरसबाबतचा सर्च कमी झाला असून तो 12व्या स्थानावर आला आहे. तर सिनेमे, बातम्या, हवामान आणि शब्दांचे अर्थ यासंबंधी सर्च वर आलेले बघायला मिळाले. आश्चर्याची बाब म्हणजे हे विषय सामान्य दिवसांमध्येही भारतात सर्वात जास्त सर्च होतात.
गुगल सर्च ट्रेड्सनुसार कोविड-19 संबंधित सर्च एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात साधारण अर्धे राहिले. पण दुसरीकडे देशात कोरोनाच्या केसेस वाढतच आहेत.
ही सर्व आकडेवारी भारतातील लोकांच्या सर्च रिझल्टवर बेस्ड आहे. यातून हे दिसतं की, लोक कोविड-19 संकटाआधीच्या स्थितीत परतत आहेत. या यादीत क्रिकेट एका अपवादाप्रमाणे वर आलाय. महामारीमुळे क्रिकेटची कोणतीही स्पर्धा सुरू नाही. पण याबाबत सर्च पाच पटीने वाढला आहे. त्यासोबतच ट्रेन्डमधून हेही कळतं की, सिनेमात लोकांनी 'पाताल लोक' बाबत सर्वात जास्त सर्च केलंय.
तसेच कोरोना व्हायरसबाबत छोट्या राज्यांमधून जास्त सर्च करण्यात आलं आहे. यात गोवा पहिल्या क्रमाकांवर राहिला, त्यानंतर मेघालय, नंतर चंडीगढ, त्रिपुरा, नागालॅंड, जम्मू-काश्मीर, दमन-दीव, सिक्कीम, हरयाणा आणि झारखंड राहिले.
गुगल ट्रेन्डनुसार यादरम्यान लोकांनी अनेक प्रश्नही सर्च केलेत. ज्यात 'वॅक्सीन काय आहे?, 'भारतात वॅक्सीन कधी येणार?', 'कोणता आजार कोरोना व्हायरससंबंधी आहे?', 'लक्षणांविना कोरोना व्हायरस पसरू शकतो का?', या प्रश्नांचा समावेश होता.
क्या बात! प्रोटेस्टनंतर 10 तास उचलत राहिला 'तो' रस्त्यावरील कचरा, खूश होऊन एकाने गिफ्ट दिली कार!
ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी कोरोना नियम मोडले, तर बॉसला होणार तुरुंगवास!