कॉलेजमुळे गमावली त्याने शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता, विद्यार्थ्याने ठोकला २० कोटी रूपयांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 01:05 PM2019-05-31T13:05:42+5:302019-05-31T13:11:45+5:30

आपण सर्वांना हे माहीत आहे की, उच्च शिक्षण मिळवणं हे काही सोपं नसतं. पुस्तकांचं ओझं, रोजच्या असायन्मेंट, परीक्षेचा दबाव या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थी नेहमी तणावात राहतात.

Indian PHD student sues an Australian university for 3 million dollar over his loss | कॉलेजमुळे गमावली त्याने शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता, विद्यार्थ्याने ठोकला २० कोटी रूपयांचा दावा

कॉलेजमुळे गमावली त्याने शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता, विद्यार्थ्याने ठोकला २० कोटी रूपयांचा दावा

Next

आपण सर्वांना हे माहीत आहे की, उच्च शिक्षण मिळवणं हे काही सोपं नसतं. पुस्तकांचं ओझं, रोजच्या असायन्मेंट, परीक्षेचा दबाव या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थी नेहमी तणावात राहतात. ऑस्ट्रेलियामध्ये पीएचडी करणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्यासोबत असंच काहीसं झालं.
५२ वर्षीय भारतीय विद्यार्थी कुलदीप मानने दावा केला आहे की, त्याने २०१५ मध्ये टाउनविले कॅम्पसमध्ये सोशल सायन्स पीएचडी कोर्ससाठी अर्ज केला होता आणि यासाठी त्याला २० हजार डॉलर म्हणजेच साधारण १४ लाख रूपये भरले होते. जेव्हा त्याने दोन विषयांसोबत अभ्यासक्रम सुरू केला तेव्हा विश्वविद्यालयाने त्याच्यावर साहित्यचोरीचा आरोप लावून त्याचं अ‍ॅडमिशन रद्द केलं. 

mensxp.com या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, एका आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनेलसोबत मान याने बोलताना सांगितले की, विश्वविद्यालयाने माझ्यासोबत अशाप्रकारचा छळ केला नसता तर माझं करिअर उद्धस्त झालं नसतं. आता माझ्याकडे पीएचडी डिग्री असती.

(Image Credit : sbs.com.au)

कुलदीप मानने पुढे सांगितले की, विश्वविद्यालयाने माझ्यासोबत जे केलं त्यामुळे माझं सगळंकाही प्रभावित झालं आहे. इतका की, मला माझ्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचीही इच्छा होत नाहीये. मी फार तणावात राहतो. माझ्यासोबत याआधी असं कधी झालं नव्हतं'.

(Image Credit : mensxp.com)

मान याने यासाठी क्वींसलॅन्डमधील जेम्स कुक विश्वविद्यालयावर ३ मिलियन डॉलर म्हणजेच साधारण २० कोटी ९० लाख रूपयांचा दावा ठोकला आहे. त्याचा दावा आहे की, विश्वविद्यालयाने त्याला इतका तणाव दिला की, त्याने शारीरिक संबंध ठेवण्याची त्याची क्षमता गमावली आहे. 

(Image Credit : Nine News, Queensland)

कुलदीपने क्वींसलॅंडच्या सुप्रीम कोर्टात २० पानांचे कागदपत्र सादर केले. त्यात त्याने संभावित गमावलेलं उत्पन्न आणि झालेला मानसिक त्रास याचा दावा ठोकला आहे. त्यासोबतच त्याने असेही सांगितले की, या मानसिक त्रासामुळे माझ्या पार्टनरसोबत माझं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. मानने आशा व्यक्त केली आहे की, सुप्रीम कोर्टाकडून त्याला नक्की न्याय मिळणार, तसेच त्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा मिळेल.

Web Title: Indian PHD student sues an Australian university for 3 million dollar over his loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.