रेल्वेच्या डब्यांवर लिहिलेल्या या कोडमध्ये दडली असते खास माहिती, जाणून घ्या 5 नंबरचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 10:47 AM2022-12-20T10:47:14+5:302022-12-20T10:47:59+5:30
Indian Railway Facts : तुम्ही रेल्वेच्या डब्ब्यांवर खास कोड लिहिलेला पाहिला का? किंवा या कोडचा अर्थ काय होतो? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? या कोड्समध्ये अनेक रहस्य दडून असतात तेच आज आम्ही सांगणार आहोत.
Indian Railway Facts : रेल्वेचा प्रवास नेहमीच एक रोमांचक प्रवास असतो. प्रवासी या प्रवासादरम्यान वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेत असतो. सुरक्षित आणि आरामदायक प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेला देशाची लाइफलाईन म्हटलं जातं. तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. पण तुम्ही रेल्वेच्या डब्ब्यांवर खास कोड लिहिलेला पाहिला का? किंवा या कोडचा अर्थ काय होतो? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? या कोड्समध्ये अनेक रहस्य दडून असतात तेच आज आम्ही सांगणार आहोत.
रेल्वेच्या डब्यावरील 5 डिजिटच्या या कोडमध्ये बरीच माहिती लपलेली असते. यात बोगीबाबत, त्याचं निर्माण कधी झालं याची माहिती आणि कोचच्या प्रकाराबाबत माहिती दडलेली असते. 5 मधील पहिले दोन नंबर दर्शवतात की, कोच कोणत्या वर्षात तयार करण्यात आला होता. तेच शेवटचे तीन नंबर सांगतात की, कोच कोणत्या प्रकारचा आहे.
पहिल्या दोन कोडचा अर्थ
डब्यावरील कोडमधून जर तुम्हाला कोचबाबत माहिती काढायची असेल तर याला दोन भागात विभागून बघा. जसे की, कोचचा नंबर जर 00296 आहे हा नंबर 00 आणि 296 असा डिवाइड करा. पहिल्या दोन कोडचा अर्थ आहे की, हा कोच साल 2000 मध्ये तयार करण्यात आला. जर एखाद्या कोचवर 95674 असा कोड लिहिला असेल तर याचा अर्थ कोचचं निर्माण 1995 मध्ये झालं आहे.
नंतरच्या 3 कोडचा अर्थ
पाचपैकी शेवटच्या तीन नंबरवरून कोचचा प्रकार जाणून घेता येतो. जर एखाद्या कोचचा नंबर 00296 असेल तर याचा दुसरा भाग 296 हे दर्शवतो की, डब्बा स्लीपर कोच आहे. जर कोचचा नंबर 95674 तर याचा अर्थ हा आहे की, कोच सेकंड क्लास सीटिंग/ जन शताब्दी चेअर कार आहे.
नंबर आणि त्यांचा अर्थ
001-025 एसी फर्स्ट क्लास
026-050 कंपोजिट (1AC + AC-2T)
051-100 एसी-टू टियर
101-150 एसी- थ्री टियर
151-200 सीसी (एसी चेयर कार)
201-400 स्लीपर (सेकंड क्लास स्लीपर)
401-600 जनरल सेकंड क्लास
601-700 सेकंड क्लास सीटिंग/जन शताब्दी चेयर कार
701-800 सीटिंग कम लगेज रॅक
801+ पॅंट्री कार, जनरेटर आणि मेल