Indian Railways: 4150 किमी प्रवास; 'ही' आहे भारतातील सर्वाल लांब पल्ल्याची ट्रेन; प्रवासाल लागतात चार दिवस...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 03:49 PM2023-04-19T15:49:59+5:302023-04-19T15:51:06+5:30
Indian Railways: एक ट्रिप पूर्ण करायला लागतात चार दिवस; जाणून घ्या या ट्रेनबद्दल संपूर्म माहिती.
Indian Train: देशातील बहुसंख्य लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. डोंगराळ भाग असो वा मोकळे पठार असो, रेल्वेने संपूर्ण देशात आपले जाळे पसरवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का,, की देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर धावते? आज आम्ही तुम्हाला त्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत. ही ट्रेन भारतातील सर्वात लांब अंतराची ट्रेन म्हणून ओळखली जाते.
82 तासांत 4150 किमी प्रवास
देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेनचे नाव विवेक एक्सप्रेस आहे. ही असामच्या दिब्रुगड ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी असा प्रवास करते. ही ट्रेन सुमारे 82 तासांत 4150 किलोमीटरहून अधिक अंतर कापते. ट्रेन क्रमांक 15906 विवेक एक्स्प्रेस दिब्रुगडहून रात्री 19:25 वाजता निघते आणि दिब्रुगढपासून 4154 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर चौथ्या दिवशी रात्री 10:00 वाजता कन्याकुमारीला पोहोचते. यादरम्यान ही ट्रेन अर्धा डझनहून अधिक राज्यांतून जाते.
ट्रेन मोठ्या स्थानकांवरून जाते
असाममधील दिब्रुगढ ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी या प्रवासात ही ट्रेन 8-9 राज्यांमधून जाते. ही ट्रेन दिब्रुगड ते कन्याकुमारी मार्गे दिमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाईगाव कोक्राझार न्यू अलीपुरद्वार, न्यू कूच बिहार, न्यू जलपाईगुडी किशनगंज मालदा टाउन, वर्धमान जंक्शन, बालासोर कटक भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा, नेल्लोर, कोइम्बारुम, कोइम्बारुम आणि कोइंकुमरुम येथे पोहोचते.