रात्रीच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करताना 'हे' काम करू नका, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 06:46 PM2023-03-10T18:46:46+5:302023-03-10T18:47:03+5:30

Indian Railway Night Rules : या नियमांचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

indian railways night travel guidelines check rules here | रात्रीच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करताना 'हे' काम करू नका, अन्यथा...

रात्रीच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करताना 'हे' काम करू नका, अन्यथा...

googlenewsNext

नवी दिल्ली : दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुविधा सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) वेळोवेळी अनेक अपडेट आणत असते. नुकतेच भारतीय रेल्वेने रात्रीच्या प्रवासासाठी काही नियम जाहीर केले आहेत. या नियमांचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे तुम्हीही अनेकदा रात्रीच्या वेळी ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला भारतीय रेल्वेच्या या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

भारतीय रेल्वेच्या नव्या गाइडलाइननुसार रात्री १० वाजल्यानंतर चालत्या ट्रेनमध्ये एखादा प्रवासी आवाज करताना, गाणी गाताना, जोरात बोलताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. दुसरीकडे, भारतीय रेल्वेने टीटीई, ऑन बोर्डिंग स्टाफ, कॅटरिंग कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना यामध्ये सहकार्य करण्यास सांगितले आहे. भारतीय रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी कोणते नियम ठरवले आहेत ते जाणून घेऊया...

रात्री प्रवास करतेवेळी हे नियम...
- रात्रीच्या वेळी कोणीही मोबाईलवर मोठ्याने बोलू शकत नाही.
- मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यास मनाई आहे.
- ट्रेनचा लाइट सोडून तर रात्री १० वाजल्यानंतर इतर कोणताही लाइट लावण्याची परवानगी नाही.
- टीटीई रात्री १० नंतर तिकीट तपासू शकत नाही.
- ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री १० नंतर बोलता येणार नाही.
- रात्री १० वाजल्यानंतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी मनाई आहे.
- ट्रेनमध्ये धूम्रपान, मद्यपान करण्यास मनाई आहे.
- लाइटर, मॅच किंवा कोणत्याही ज्वलनशील पदार्थांना परवानगी नाही.

मिडल बर्थसाठी काय आहे नियम?
दुसरीकडे, १० वाजल्यानंतर लोअर बर्थवर जर एखादा प्रवासी बसला असेल तर त्याला सांगून तुम्ही मिडल बर्थ उघडू शकता. यासाठी सकाळी १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मिडल बर्थ उघडण्याचा नियम आहे. यासाठी कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही.

Web Title: indian railways night travel guidelines check rules here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.