Knowledge : ट्रेन ड्रायव्हरला इंजिनिअरपेक्षाही जास्त मिळतो पगार, काय आहे याचं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 03:00 PM2021-09-29T15:00:02+5:302021-09-29T15:00:44+5:30
त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. चला आम्ही तुम्हाला सांगतो की, लोको पायलटला किती पगार मिळतो आणि त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो.
तुम्ही कधी विचार केलाय का की, रेल्वे चालवणाऱ्या ड्रायव्हरला किती सतर्क रहावं लागतं. दिवस-रात्र, २४ तास रेल्वे चालवणाऱ्या ड्रायव्हरला ऑफिशिअल टर्ममध्ये लोको पायलट म्हटलं जातं. लोको पायलटचं काम फार कठीण असतं. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा आणि सर्व उत्सवांवेळी लोको पायलट आपल्या ड्यूटीवर अलर्ट असतात. कारण त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. चला आम्ही तुम्हाला सांगतो की, लोको पायलटला किती पगार मिळतो आणि त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो.
किती तास करावं लागतं काम?
लोको पायलटचं काम इतकं रिस्की आणि जबाबदारीचं असतं की, चूक करण्याची शक्यता पूर्णपणे झीरो असते. रेल्वे चालू असताना लोको पायलटला अलर्ट रहावं लागतं. त्यामुळेच या कामासाठी त्यांची सॅलरी एका सॉफ्टवेअर इंजिनिअरपेक्षाही जास्त असते. दिवस-रात्र ड्यूटी करत असलेल्या लोको पायलटचं डेली रूटीन फिक्स्ड नसतं. त्यांना १४ दिवसांचं रोस्टर दिलं जातं. ज्यात त्यांना २ रेस्ट दिले जातात. त्यांना साधारण १०४ तास काम करावं लागतं. वास्तविक त्यांना यापेक्षा जास्त काम करावं लागतं.
लोको पायलट्सना मिळतात वेगवेगळे अलाउंस
लोको पायलट एकदा घरातून निघाल्यावर ३ ते ४ दिवसांनंतरच घरी येतात. त्यामुळे त्यांचं फॅमिली लाइफही अडचणीचं असतं. लोको पायलट जेव्हा एंट्री लेव्हलवर जातात तेव्हा त्यांची पोस्ट असिस्टंट लोको पायलट असते. जी ७व्या वेतन आयोगाच्या लेव्हल २ वर येते. त्यांची कठिण ड्युटीमुळे रेल्वेने त्यांना अनेक अलाउंस दिले आहेत. त्यांना १०० किमीच्या ट्रेन रनिंगवर अलाउंस मिळतो. ड्युटीच्या १४ दिवसात १०४ तासांपेक्षा जास्त काम केलं तर ओव्हरटाइमचे पैसेही मिळतात.
म्हणून लोको पायलटला जास्त सॅलरी
लोको पायलट्सना नाइट ड्युटी अलाउंस, हॉलीडे अलाउंस, ड्रेस आणि लीव अलाउंसही मिळतात. हे सगळं मिळून एंट्री लेव्हलच्या लोको पायलट्सना सॅलरी चांगली मिळते. जेव्हा हे सीनिअर लोको पायलट बनतात तेव्हा अनेकदा सॅलरी १ लाख रूपयांपेक्षा जास्तही असते. सॅलरी जास्त असण्याचं कारण त्यांची कठिण ड्युटी.
ही माहिती भारती रेल्वेच्या एका जुन्या सर्कुलरच्या आधारावर आहे. यातून लोको पायलटच्या सर्वच कॅटेगरीच्या पे-ग्रेडला समजून घेतलं जाऊ शकतं.