महिला हमालाबाबत रेल्वेने असं काय ट्विट केलं जे पाहून लोक संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:09 PM2020-03-05T17:09:05+5:302020-03-05T17:10:31+5:30

भारतीय रेल्वेचे महिलांबद्दलचे ट्विट पाहून नेटकरी संतापले.

Indian railways tribute to women coolie but people are criticizing myb | महिला हमालाबाबत रेल्वेने असं काय ट्विट केलं जे पाहून लोक संतापले!

महिला हमालाबाबत रेल्वेने असं काय ट्विट केलं जे पाहून लोक संतापले!

googlenewsNext

तुमच्यापैकी अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतील. आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमी पुरूष हमाल पाहत असतो. पण महिला हमाल तुम्ही कधी पाहिली नसेल.  अनेक ठिकाणी आपलं पोट भरण्यासाठी फक्त पुरूषंच नाही तर महिला सुद्धा हमालीचं काम करतात. या महिलांच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं  जातं.

 त्याचप्रमाणे  रेल्वेने सुद्धा ट्विटरच्या माध्यामातून या महिलांना शाब्बासकी दिली आहे.  या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे  की भारतीय  रेल्वेसाठी काम  करत असलेल्या हमाल महिला या कोणत्याही कामात मागे नाहित. असं म्हणत रेल्वेने या महिलांना सेल्युट सुद्धा केलं आहे.  ४ मार्चला हे ट्विट  केलं आहे. 

या ट्विटवर अनेक युजर्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.  बेटी बचाओ, बेटी पढाओ चं स्लोगन सुद्दा ट्विटमध्ये टाकले आहे. या महिलांना काही वेगळं काम द्यायला हवं.   महिलांना ओझं उचलायला लावणार का असा संतप्त सवास केला आहे. 

त्यांना सन्माननीय  वागणूक मिळायला हवी. इतकंच नाही अनेक लोकांनी रेल्वेला ट्विट करून राग व्यक्त केला आहे. 

Web Title: Indian railways tribute to women coolie but people are criticizing myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.