एका भारतीयाने जुगाड करून समोसा अंतराळात पाठवला, वाचा पुढे काय झालं....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 15:37 IST2021-01-13T15:19:37+5:302021-01-13T15:37:51+5:30
झालं असं की, ब्रिटनच्या एका रेस्टॉरन्टने अंतराळात एक समोसा पाठवण्याचा प्रयत्न केला होता. पण हा समोसा अंतराळाऐवजी फ्रान्समध्ये पोहोचला.

एका भारतीयाने जुगाड करून समोसा अंतराळात पाठवला, वाचा पुढे काय झालं....
'जब तक रहेगा समोसे में आलू, तेरा रहूंगा ओ मेरी शालू' गाण्याच्या या ओळी वाचल्या की तुम्हाला समोसा नक्कीच आठवला असेल. आता समोसा इथे यासाठी आला की, समोस्यासंबंधी एक अजब घटना समोर आली आहे. झालं असं की, ब्रिटनच्या एका रेस्टॉरन्टने अंतराळात एक समोसा पाठवण्याचा प्रयत्न केला होता. पण हा समोसा अंतराळाऐवजी फ्रान्समध्ये पोहोचला.
मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या 'चाय वाला' नावाच्या रेस्टॉरन्टने वेदर बलूनच्या माध्यमातून अंतराळात आपलं फेवरेट स्नॅक्स पाठवण्याचा प्रयत्न केला. रेस्टॉरन्टचा मालक नीरज गाधीरने या अनोख्या प्रयत्नाचा व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. नीरज गाधीर म्हणाला की, त्याने गंमतीगमतीत अंतराळात समोसा पाठण्याचा विषय काढला होता. मग विचार केला की, असं ट्राय करून बघायला काय हरकत आहे.
असे सांगितले जात आहे की, नीरजने एक फुगा रिकामाच अंतराळात सोडला. त्यानंतर त्याने दुसरा प्रयत्न केला. पण त्यात हीलियम कमी होतं. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश आलं. हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, नीरजने त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्याचं लोक भरभरून प्रयत्न करत आहेत. चला अंतराळात नाही पण समोसा फ्रान्समध्ये पोहोचला ही सुद्धा मोठी बाब आहे.