इंडियन की वेस्टर्न, कोणतं टॉयलेट आहे बेस्ट? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 03:52 PM2023-01-02T15:52:36+5:302023-01-02T15:53:14+5:30
आजकाल आपल्याकडे वेस्टर्न टॉयलेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरात किंवा ग्रामीण भागातही वेस्टर्न टॉयलेट वापरले जात आहेत. पण, या टॉयलेटचे फायदा आहेत की तोटे हे कुणालाच नाही.
आजकाल आपल्याकडे वेस्टर्न टॉयलेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरात किंवा ग्रामीण भागातही वेस्टर्न टॉयलेट वापरले जात आहेत. पण, या टॉयलेटचे फायदा आहेत की तोटे हे कुणालाच नाही.वेस्टर्न टॉयलेटमुळे आपल्या शरिरात काही परिणाम होतात की नाही हे माहित असणे गरजेचे आहे. वेस्टर्न सीट आरामदायी आहे, पण देसी टॉयलेटमुळे पूर्ण शरिराची मूव्हमेंट होते. याशिवाय, वेस्टर्न टॉयलेटमध्ये संसर्गाचा धोकाही जास्त असतो कारण ते वापरताना संपूर्ण त्वचेचा संपर्क येतो.
एका रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे. जेव्हा एखादा व्यक्ती देसी टॉयलेट वापरतो तेव्हा त्या व्यक्तीची पूर्ण बॉडीची हालचाल होते. पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरावर दबाव असतो, पण वेस्टर्न टॉयलेट आरामदायी असते, त्यामुळे आपण आजारी पडू शकतो.
देसी टॉयलेट सीटवर फ्रेश होण्यासाठी देखील कमी वेळ लागतो. पोट साफ होण्यासाठी 3 ते 4 मिनिटे लागतात, तर वेस्टर्न टॉयलेटसाठी 5 ते 7 मिनिटे लागतात.देसी टॉयलेट वापरल्याने पोट आणि पचनसंस्थेवर दबाव येतो. त्यामुळे पोट लवकर साफ होते.
कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट
वेस्टर्न टॉयलेट वापरल्याने संसर्गाचा धोका वाढतो. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. वेस्टर्न टॉयलेट त्वचेच्या संपर्कात येते. यामुळे आजारी पडू शकता. इंडियन टॉयलेट गरोदरपणात महिलांसाठी उत्तम आहे. कारण त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते.