भारतातील एक असं गाव जिथे राहतो केवळ एक परिवार, कारण वाचून बसेल धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:19 PM2023-09-14T13:19:30+5:302023-09-14T13:19:56+5:30
आज आम्ही तुम्हाला भारताच्या एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जिथे केवळ एकच परिवार राहतो.
भारत विविधतेने नटलेला देश आहे. इथे तुम्हाला प्रत्येक राज्यात असं काही वेगळं बघायला मिळतं जे देशाबाबत तुमचा दृष्टीकोन बदलतं. कुठे तुम्हाला फार जास्त लोकसंख्या बघायला मिळेल तर कुठे काहीच नाही. काही ठिकाणी तर प्राणीही दिसत नाहीत. तरीही भारत देश खास आहे. आज आम्ही तुम्हाला भारताच्या एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जिथे केवळ एकच परिवार राहतो.
भारताच्या या गावाचं नाव बर्धनारा नंबर-2 (No 2 Bardhanara). याच नावाचं आणखी एक गाव आहे ज्याचं नाव बर्धनारा नंबर-1 आहे. हे गाव आसामच्या नालबारी जिल्ह्यात येतं. काही वर्षाआधी आसामच्या एका मुख्यमंत्र्याने गावात एका रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. पण तो रस्ता आता राहिला नाही. हा एकच रस्ता गावाला मुख्य शहरासोबत जोडत होता. पण आता तोही नाही.
काही दशकांआधी या गावात बरेच लोक राहत होते. 2011 च्या जनगणनेमुसार, नंबर 2 बर्धनारा गावात 16 लोक राहत होते. पण आता ती संख्या आणखी कमी झाली झाली आहे. एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, या गावात केव एकच परिवार राहतो. ज्यात 5 सदस्य आहेत. लोक इथून निघून गेले कारण या गावात रस्ते नव्हते. पावसाळ्यात लोकांना खूप समस्या होत होत्या. आजही या गावात राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात नावेच्या मदतीने प्रवास करावा लागतो.
इथे राहणाऱ्या परिवाराच्या कुटुंब प्रमुखाचं नाव बिमल डेका आहे. तो त्याची पत्नी अनीमा, तीन मुले नरेन दिपाली आणि सियुतीसोबत गावात राहतो. रिपोर्ट्सनुसार, बिमल डेकाच्या मुलांनी सांगितलं की, त्यांना शाळेत जाण्यात चिखलातून 2 किमी पायी चालत जावं लागतं. पावसाळ्यात नावेने जावं लागतं.
इतक्या वाईट स्थितीत राहूनही बिमल यांनी मुलांना चांगलं शिक्षण दिलं आहे. दिपाली आणि नरेन यांनी पदवी मिळवली आहे तर सियुती 12वी मध्ये आहे. त्यांचं मत आहे की, प्रशासन गावाकडे लक्षच देत नाहीत. त्यामुळे गावाची स्थिती बिघडली आहे.