भारतातील कोणत्या गावात सगळ्यात आधी होतो सूर्योदय? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:46 IST2023-11-08T15:45:37+5:302023-11-08T15:46:08+5:30
भारतात सूर्य सगळ्यात आधी कुठे उगवतो? या गावाचं नाव जवळपास 99 टक्के लोकांना माहीत नसेल.

भारतातील कोणत्या गावात सगळ्यात आधी होतो सूर्योदय? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर...
भारतासारखा अनोखा देश क्वचितच जगभरात कुठे सापडेल. या देशाची खास बाब म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं खाण-पाण, लोग, भाषा आणि वातावरण यांच्यातील फरक दिसून येईल. इतकंच नाहीतर सूर्य उगवणं आणि सुर्यास्त यांच्यातीलही फरक दिसून येईल. पण तुम्ही कधी विचार केला का की, भारतात सूर्य सगळ्यात आधी कुठे उगवतो? या गावाचं नाव जवळपास 99 टक्के लोकांना माहीत नसेल.
आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा गावाबाबत सांगणार आहोत जिथे सूर्योदय (First sunrise in India) सगळ्यात पहिले होतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोरावर एकाने प्रश्न विचारला होता की, 'भारतात सूर्य सगळ्यात आधी कुठे उगवतो?'. चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...
शमवील नावाच्या एका यूजरने सांगितलं की, 1999 मध्ये अरूणाचल प्रदेशातील डोंग नावाच्या एका जागेचा शोध घेण्यात आला. तेव्हा समजलं की, देशात सगळ्यात आधी इथेच होतो. रजनीकांत नावाच्या यूजरने सांगितलं की, सूर्य सगळ्यात आधी अरूणाचल प्रदेशात उगवतो.
गावात 4 वाजता होतो सूर्यास्त
आता ही लोकांनी उत्तरं झाली जी बरोबर आहेत. भारतात सूर्योदय सगळ्यात आधी अरुणाचल प्रदेशात होतो. पण आपला प्रश्न आहे की, असं कोणतं गाव आहे जिथे सूर्योदय सगळ्यात आधी होतो. अरुणाचल प्रदेशातडोंग घाटी आहे. हे एक गाव आहे. ज्याचं नाव डोंग आहे. या डोंग गावातच सगळ्यात आधी सूर्योदय होताना दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सकाळी 4 वाजता दरम्यानच इथे सूर्योदय होतो आणि सायंकाळी 4 वाजता सूर्यास्त होऊ लागतो. हे गाव जमिनीवरून साधारण 1240 मीटर उंचीवर स्थित आहे.