जगाच्या तुलनेत भारतीय महिला आहेत जास्त रागीट, समोर आलं हे मोठं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:33 PM2022-12-10T13:33:19+5:302022-12-10T13:33:56+5:30

Gallup Report says women getting angrier:लोकांमध्ये तणाव आणि रागाचा स्तर वेगाने वाढत आहे. खासकरून भारतीय महिलांमध्ये. ग्लोबल सर्वेनुसार, भारतीय महिलांमध्ये पुरूषांच्या तुलनेत रागाची भावना दुप्पट आहे.

Indian womans rage is at all time high as per gallup poll report | जगाच्या तुलनेत भारतीय महिला आहेत जास्त रागीट, समोर आलं हे मोठं कारण...

जगाच्या तुलनेत भारतीय महिला आहेत जास्त रागीट, समोर आलं हे मोठं कारण...

googlenewsNext

Gallup Report says women getting angrier: जगभरात पुरूषांच्या तुलने आक्रोशाची भावना वाढत आहे. असं आमचं नाही तर एका ग्लोबल सर्वेचं मत आहे. काळानुसार लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल होत आहे. या बदलासोबत आता इमोशन स्केलही वाढत आहे. लोकांमध्ये तणाव आणि रागाचा स्तर वेगाने वाढत आहे. खासकरून भारतीय महिलांमध्ये. ग्लोबल सर्वेनुसार, भारतीय महिलांमध्ये पुरूषांच्या तुलनेत रागाची भावना दुप्पट आहे.

धक्कादायक खुलासा

हा ग्लोबल इमोशनल पोल तयार केला आहे 'गॅलप वर्ल्ड पोल' ने. ज्यात गेल्या दशकात लोकांची बदलती मानसिक स्थिती आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी एक मोठा अभ्यास करण्यात आला. 2012 पासून ते 2021 दरम्यान लोकांची मनस्थिती हैराण करणारी होती. गॅलप वर्ल्ड पोलने या अभ्यासासाठी 150 देशांचा समावेश केला होता. ज्यात 12 लाख लोक या सर्वेचा भाग बनले. ज्याचे निष्कर्ष हैराण करणारे होते.

सर्वेतून काय आलं समोर

वेगाने बदलत आहे जगाची स्थिती, आता त्यांच्या इमोशन्सना प्रभावित करत आहे. गॅलपच्या सर्वेनुसार, एक दशकाआधी महिलांचा राग पुरूषांच्या बरोबर होता, पण सध्या 6 टक्क्यांनी वाढला आहे. हे तर झालं जगातील महिलांबाबत. पण जर भारत आणि पाकिस्तानातील महिलांबाबत सांगायचं तर सर्वेचे निष्कर्ष विचारात पाडतात. कारण जगाच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तानमधील महिलांमध्ये रागची भावना दुप्पट आहे. आकडेवारीनुसार, समजून घ्यायचं तर जिथे जगात महिलांच्या रागाचा स्तर पुरूषांच्या तुलनेत 6 टक्के आहे. तेच भारत आणि पाकिस्तानातील महिलांमध्ये हा  12 टक्के जास्त आहे. 

महिलांमध्ये जास्त रागाचं कारण?

2019 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांच्या भावनात्मक बदलात एक मोठी नकारात्मक भूमिका निभावली. लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन, हाइपर टेंशन आणि रागाची समस्या वेगाने वाढत आहे. खासकरून त्या महिलांमध्ये घर सांभाळण्यासाठी अनेक जबाबदाऱ्या होत्या. गेल्या दशकातील शेवटच्या दोन वर्षात महिलांच्या रागात वाढ झाली आहे. जगातल्या जास्तीत जास्त महिला आता जास्त शिकलेल्या आणि सेल्प डिपेंडेंट आहेत. जॉब कल्चर वाढल्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यामुळे त्या चुकीच्या व्यवहारावर लगेच व्यक्त होतात. पण या बदलत्या काळातही पुरूष प्रधान विचार शिल्लक आहेत. तरीही जास्तीत जास्त घरांतील महिला कुठेना कुठे बिनधास्तपणे आक्रोश व्यक्त करत आहेत.

काय आहे यामागचं कारण?

नोकरीत उच्च पदाचा विषय असो वा पगाराचा विषय असो. महिलांना कमी समजणं किंवा त्यांच्यासोबत भेदभाव करणं त्यांच्या रागाचं मुख्य कारण आहे. महिलांमध्ये वाढत असणाऱ्या रागाला चुकीचं म्हणणं तर सोपं आहे. पण त्याच्या कारणाकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही.
घर असो वा बाहेर प्रत्येक ठिकाणी महिलांना कमी लेखणं दशकांपासून नुकसानकारक ठरत आहे. पण बदलत्या काळात महिला त्यांच्या हिंमतीने पुढे जात आहेत. पण हा आत्मविश्वास त्यांच्यात कुठेना कुठे राग निर्माण करत आहे. 

त्यासोबत महिलांनी त्यांचं यश आणि आत्मविश्वासाला उत्साहात न घेता सकारात्मक पद्धतीने समाजासमोर सादर करावं. आपसी सहयोगाने समाजाला योग्य दिशेने नेता येऊ शकतं. या सगळ्या गोष्टींवर लक्ष देत महिलांच्या रागीट प्रतिमेला बदलता येऊ शकतं.

Web Title: Indian womans rage is at all time high as per gallup poll report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.