टीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालवतात भारतीय लोक, जाणून घ्या काय बघतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 02:49 PM2018-10-06T14:49:06+5:302018-10-06T14:49:32+5:30
तुम्ही रोज किती तास टीव्ही बघता? हा प्रश्न वाचून तुम्ही विचारात पडला असाल ना? मग हा विचार करत असाल की, टीव्ही पेक्षा जास्त तुम्ही तर मोबाईलवर जास्त वेळ घालवता.
तुम्ही रोज किती तास टीव्ही बघता? हा प्रश्न वाचून तुम्ही विचारात पडला असाल ना? मग हा विचार करत असाल की, टीव्ही पेक्षा जास्त तुम्ही तर मोबाईलवर जास्त वेळ घालवता. नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवतात. या शोधातून हेही मसोर आले आहे की, भारतीय लोक इतका वेळ मोबाईलमध्ये काय बघतात.
या शोधातून समोर आले आहे की, भारतीय यूजर्स आठवड्यातील ऑनलाईस व्हिडीओ कंटेन्ट बघण्यात सरासरी ८ तास २८ मिनिटे इतका वेळ खर्च करतात. तर हेच लोक टीव्ही बघण्यात आठवड्यातील ८ तास ८ मिनिटे इतका वेळ घालवतात.
‘लाईमलाईट नेटवर्क्स’ कडून जाहीर करण्यात आलेल्या या रिपोर्टनुसार, 'जितका वेळ भारतीय यूजर्स ऑनलाईन व्हिडीओ बघण्यात घालवतात, हे प्रमाण जागतिक प्रमाणापेक्षा अधिक आहे. हेच जागतिक प्रमाण ६ तास ४५ मिनिटे इतकं आहे. २०१६ च्या आकडेवारीमध्ये ५८ टक्के वाढ झाली आहे'.
‘स्टेट ऑफ ऑनलाइन व्हिडीओ 2018’ नावाच्या रिपोर्टनुसार, ऑनलाईन चॅनल्समध्ये भारतीय प्रेक्षक सर्वात जास्त सिनेमे बघतात. त्यानंतर ऑनलाईन बघितल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये न्यूज, टीव्ही शो आणि खेळ यांचा समावेश आहे.
लाईमलाईट नेटवर्क्सचे दक्षिणपूर्व आशिया आणि भारताचे वरिष्ठ निर्देशक जहीर अब्बास म्हणाले की, 'ऑनलाईल मीडियाने भारतीय ग्राहाकांना चांगला पर्याय उपलब्ध करुन दिलाय. ते सगळंकाही ऑनलाईल बघू लागले आहेत. त्यावर ते कधीही मनोरंजन आणि टीव्ही सीरिजचा आनंद घेऊ शकतात'.