रोज साबणाने आंघोळ करणाऱ्यांनो देशातील पहिल्या स्वदेशी साबणाबाबत माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:31 PM2021-05-25T12:31:47+5:302021-05-25T12:32:08+5:30
देशातील पहिला साबण कसा दिसत होता. इत्यादी...इत्यादी. जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या साबणाबाबत सांगणार आहोत.
लोक रोज अंगावर साबण घासून घासून आंघोळ करतात. शरीर स्वच्छ आणि सुंगधित ठेवायचं असेल तर साबण तर लावावंच लागेल. पण कधी साबणाचा वापर करताना तुम्ही याच्या इतिहासाचा विचार केलाय? म्हणजे भारतात पहिलं साबण कधी आलं आणि कोणत्या कंपनीने लॉन्च केलं होतं. देशातील पहिला साबण कसा दिसत होता. इत्यादी...इत्यादी. जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या साबणाबाबत सांगणार आहोत.
स्वातंत्र्याआधी देशात साबणाचा पहिला स्वदेशी कारखाना जमशेदजी टाटा यांनी सुरू केला होता. जमशेदजी टाटा यांनी १९१८ मध्ये कोच्चिमध्ये Tata Oil Mills चा कारखाना सुरू केला होता. १९३० मध्ये टाटा कंपनीने मार्केटमध्ये पहिला साबण आणला होता. त्या साबणाचं नाव होतं 'OK'. भारतातील पहिला आंघोळीचा साबण OK.
टाटा ग्रुपने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त मार्केटिंग प्लानिंग केलं होतं. साबण चांगला होता आणि त्याची जाहिरातही जबरदस्त होती. मात्र, इतकं ब्रांडिंग करूनही भारतातील पहिला स्वदेशी साबण भारतात टिकू शकला नाही.
मीडिया रिपोर्टनुसार त्यावेळी लोक सुगंधित साबणाचा वापर कमी करत होते. जास्तीत जास्त लोक बेसन सारख्या देशी गोष्टींचा आंघोळीसाठी वापर करत होते. सोबतच मार्केटमध्ये Lifebuoy साबणही होताच. कमी किंमतीचा Lifebuoy साबण टाटाच्या ब्रॅन्डला टक्कर देत होता. OK आल्यानंतर Lifebuoy आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली.
कमी पैशात Lifebuoy लोकांना शरीरावरील कीटाणू मारणारं प्रॉडक्ट देत होते. तेच OK जाहिरातीतून लोकांचं लक्ष आकर्षित करत होता. पण हे जास्त दिवस चाललं नाही. त्यावेळी साबणावर इतके पैसे खर्च करण्याचा कुणाचा विचारही नव्हता. त्यामुळे भारतीय लोक Lifebuoy कडे वळत होते. तर काही लोक त्यांच्या देशी जुगाडांनी आनंदी होते.
याच कारणांनी टाटा ब्रॅन्डचा OK साबण मार्केटमध्ये आपली जागा बनवू शकला नव्हता. त्यानंतर हा साबण मार्केटमधून पूर्णपणे गायब झाला.