भारतातील एक अशी नदी ज्यातील पाणी असतं खारं, वाहता वाहता अचानक होते गायब!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 03:35 PM2023-11-17T15:35:09+5:302023-11-17T15:37:11+5:30

भारतात एक अशीही नदी आहे जी समुद्रात न सामावता गायब होते.

India's only river luni doesnt fall in any ocean | भारतातील एक अशी नदी ज्यातील पाणी असतं खारं, वाहता वाहता अचानक होते गायब!

भारतातील एक अशी नदी ज्यातील पाणी असतं खारं, वाहता वाहता अचानक होते गायब!

भारतात अनेक नद्या आहेत. या नद्यांच्या पाण्यातूनन लोकांची तहान भागते. जेव्हा नद्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करू शकल्या नाही तेव्हा विहिरी, धरणं बांधण्यात आली. भारतात जवळपास सगळ्याच नद्या वाहत जाऊन समुद्राला मिळतात. नद्या एकतर बंगालच्या खाडीत सामावतात किंवा अरबी समुद्रात. पण भारतात एक अशीही नदी आहे जी समुद्रात न सामावता गायब होते.

नद्यांचं पाणी सामान्यपणे गोड असतं. यात अनेक जीव जगतात. लोक या पाण्याने आपली तहान भागवतात. पण समुद्राचं पाणी पिण्यालायक नसतं. कारण ते पाणी खारं असतं. मात्र, भारतात एक अशी नदी आहे जिचं पाणी कुणीही पिऊ शकत नाही. याचं कारण आहे यातील खारं पाणी. भारतात एकुलती एक अशी नदी आहे जिचं पाणी खारं असतं. त्याशिवाय ही नदी यामुळेही खास आहे कारण नदी कोणत्याही समुद्राला जाऊन मिळत नाही.

लूनी नदी असं या अनोख्या नदीचं नाव आहे. ही नदी जास्त खोल नसते. ती पसरून वाहते. जेव्हा नदी रूंदावते त्यातील पाणी लवकर वाफ होऊन जातं. सोबतच लूनी नदी राजस्थानच्या अशा भागांमधून वाहते जिथे खूप जास्त उष्णता असते. त्यामुळे ती वाहता वाहता गायब होते. लूनी नदी थार वाळवंटातून निघाल्यावर गुजरातच्या रण ऑफ कच्छमध्ये येऊन गायब होते. 

Web Title: India's only river luni doesnt fall in any ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.