अरे बाप रे बाप! 'या' भिकाऱ्यांकडे आहे कोट्यावधींची संपत्ती, किती ते वाचून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 04:24 PM2021-07-26T16:24:39+5:302021-07-26T16:26:19+5:30

देशात असे अनेक भिकारी आहेत जे कोट्याधीश आहेत आणि त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. पण ते आजही भीक मागून जगतात.

India's Richest Beggars Who Are Richer Than You Think | अरे बाप रे बाप! 'या' भिकाऱ्यांकडे आहे कोट्यावधींची संपत्ती, किती ते वाचून चक्रावून जाल...

अरे बाप रे बाप! 'या' भिकाऱ्यांकडे आहे कोट्यावधींची संपत्ती, किती ते वाचून चक्रावून जाल...

Next

देशातील प्रत्येक चौकात, गल्लीत, बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशनवर तुम्हाला कित्येक भिकारी भीक मागताना दिसतील. आपण ज्या भिकाऱ्यांना गरीब आणि लाचार समजून काही पैसे, जेवण देतो त्यांच्याकडे जर तुमच्यापेक्षाही जास्त पैसे असतील तर? होय...देशात असे अनेक भिकारी आहेत जे कोट्याधीश आहेत आणि त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. पण ते आजही भीक मागून जगतात.

भारताच्या सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांबाबत वाचल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. या भिकाऱ्यांकडे त्या सर्व सुविधा आहेत ज्या कदाचित एका सामान्य माणसाकडेही नसतील. त्यांच्याकडे मोठं बॅंक बॅलन्स आहे. पण तरी सुद्धा ते रस्त्यावर भीक मागतात. इंडिया टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, देशातील भिकाऱ्यांच्या लिस्ट सर्वात पहिलं नाव येतं भरत जैन याचं. तो जास्तकरून मुंबईच्या परळ भागात भीक मागतो. रिपोर्टनुसार, त्याच्याकडे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. ज्यांची किंमत ७० लाख रूपये आहे. तो महिन्याला जवळपास ७५ हजार रूपये भीक मागून कमावतो.

भारतातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याच्या लिस्टमध्ये दुसरा नंबर लागतो कोलकाता येथील लक्ष्मीचा. लक्ष्मीने १९६४ पासून कोलकाता मध्ये १६ वर्षांची असतानापासून भीक मागायला सुरूवात केली होती. ५० पेक्षा जास्त वर्ष भीक मागून तिने लाखो रूपयांची कमाई केली आहे. लक्ष्मी आजही दररोज १ हजार रूपये भीक मागून कमावते. 

मुंबईतीलच गीताही श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत आहे. गीता मुंबईच्या चर्नी रोडवर भीक मागते. असं सांगितलं जातं की, तिचा स्वत:चा फ्लॅट आहे आणि ती तिच्या भावासोबत राहते गीता रोद १५०० रूपये भीक मागून कमावते.
 

Web Title: India's Richest Beggars Who Are Richer Than You Think

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.