काळ्या टोमॅटोंची वाढली डिमांड, होऊ शकते मोठी कमाई; जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:04 AM2024-02-23T11:04:12+5:302024-02-23T11:04:57+5:30

Indigo black tomato : आतापर्यंत तुम्ही लाल टोमॅटो पाहिले असतील, पण आता बाजारात काळे टोमॅटोही आले आहेत.

Indigo black tomato farming earn good money know all details | काळ्या टोमॅटोंची वाढली डिमांड, होऊ शकते मोठी कमाई; जाणून घ्या किंमत...

काळ्या टोमॅटोंची वाढली डिमांड, होऊ शकते मोठी कमाई; जाणून घ्या किंमत...

Indigo black tomato : जर तुम्हाला जुन्या पद्धतीने शेती करायचा सोडून जास्त पैसे कमवायचे असतील तर आम्ही तुम्हाला एक वेगळी आयडिया सांगणार आहोत. ही एक चांगली संकल्पना आहे जी भारतात नवीन आहे. याची डिमांड वाढत चालली आहे. आतापर्यंत तुम्ही लाल टोमॅटो पाहिले असतील, पण आता बाजारात काळे टोमॅटोही आले आहेत. लोकांनाही हे टोमॅटो आवडत आहेत. या टोमॅटोंची खासियत म्हणजे यांची कॅन्सरच्या उपचारातही मदत होते. त्याशिवाय शरीराला अनेक फायदे मिळतात.

काळ्या टोमॅटोंना इंडिगो रोज टोमॅटो असं म्हटलं जातं. यांचं उत्पादन सगळ्यात आधी इंग्लंडमध्ये झालं होतं. याच्या शोधाचं श्रेय रे ब्राउन याना जातं. रे ब्राउनने जेनेटिक म्यूटेशनच्या माध्यमातून काळ्या टोमॅटोची निर्मिती केली. आता भारतातही काळ्या टोमॅटोंची शेती सुरू झाली आहे. याला यूरोपच्या मार्केटमध्ये सुपरफूड म्हटलं जातं. 

इंडिगो रोज रेड आणि जांभळ्या टोमॅटोंच्या बियांना एक करून एक नवीन प्रजाती तयार करण्यात आली. ज्यातून हे हायब्रीड टोमॅटो तयार झालं. इंग्लंडसारखंच काळ्या टोमॅटोसाठी भारतातील वातावरण चांगलं आहे. यांची लागवडही लाल टोमॅटोसारखीच केली जाते. याची झाडे थंड ठिकाणांवर विकसित होत नाहीत.
लाल टोमॅटोंच्या तुलनेत काळ्या टोमॅटोंचं उत्पादन उशीरा होतं. लागवड करण्यासाठी जानेवारी महिना चांगला मानला जातो. मार्च-एप्रिलपर्यंत तुम्हाला याचं उत्पादन मिळू शकतं.

असं सांगितलं जात आहे की, काळ्या टोमॅटोमध्ये लाल टोमॅटोंपेक्षा जास्त औषधी गुण असतात. हे जास्त काळ ताजे राहतात. वेगळ्या रंगाचे असल्याने यांची किंमत बाजारात लाल टोमॅटोपेक्षा जास्त असते. या टोमॅटोमुळे वजन कमी करण्यापासून ते शुगर लेव्हल कमी करणे, कोलेस्ट्रोल तमी करण्यासही मदत मिळते. हा टोमॅटो बाहेरून काळा आणि आतून लाल असतो. 

काळ्या टोमॅटोच्या लागवडीतही तेवढाच खर्च येतो जेवढा लाल टोमॅटोसाठी येतो. काळ्या टोमॅटोसाठी केवळ बियांसाठी जास्त पैसे लागतात. काळ्या टोमॅटोच्या शेतीत पूर्ण खर्च काढून प्रति हेक्टर 4 ते 5 लाख रूपये फायदा होऊ शकतो. काळ्या टोमॅटोंच्या पॅकिंगने फायदा आणखी वाढू शकतो. 

Web Title: Indigo black tomato farming earn good money know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.