विमान कंपनीच्या सीईओनेच केली हार्ले डेविडसनचा एक-एक पार्ट वेगळा करून तस्करी, पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 12:18 PM2019-12-07T12:18:01+5:302019-12-07T12:27:03+5:30

विमान कंपनीच्या सीईओने केली हार्ले डेविडसन बाइकची तस्करी, पण वेळीच झाला भांडाफोड.

Indonesia airlines ceo harley davidson on plane got fired | विमान कंपनीच्या सीईओनेच केली हार्ले डेविडसनचा एक-एक पार्ट वेगळा करून तस्करी, पण....

विमान कंपनीच्या सीईओनेच केली हार्ले डेविडसनचा एक-एक पार्ट वेगळा करून तस्करी, पण....

googlenewsNext

इंडोनेशियातील राष्ट्रीय विमान कंपनीचं नाव गरूडा असं आहे. या कंपनीचेच सीईओ एका बाइकची स्मगलिंग करत होते. साधीसुधी नाही तर हार्ले डेविडसन. सगळं सेटींग झालं होतं. पण शेवटी त्याचा भांडाफोड झाला आणि तो पकडला गेला. या बाइकची किंमत ५७ हजार यूएस डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार ही किंमत ४० लाख रूपये इतकी होते.

फ्रान्सहून मागवली होती बाइक

(Image Credit : bangkokpost.com)

या कंपनीच्या सीईओचं नाव आहे Ari Ashkara. त्याने फ्रान्सहून हार्ले डेविडसन कंपनीची बाईक मागवली होती. कुणाला काही कळू नये म्हणून त्याने बाईकचा प्रत्येक पार्ट वेगळा करून मागवला होता. तर बाइकची कागदपत्रे दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर तयार केले होते. हे सगळं त्याने कस्टम ड्युटी वाचवण्यासाठी केलं.

प्रेयसीच्या मॅनेजरने दिले होते पैसे

अॅम्स्टर्डॅममध्ये या सीईओच्या होणाऱ्या बायकोच्या मॅनेजरने या बाइकची रक्कम पे केली होती. State-Owned Enterprises मिनिस्टर एरिक यांनी सांगितले की, या केसमध्ये आणखीही काही लोक गुंतले असल्याची शक्यता आहे. 

(Image Credit : asiaone.com)

या बाइकचे पार्ट्स प्लेनच्या कंटेनरमध्ये लपवण्यात आले होते. बाइकचे पूर्ण पार्ट्स वेगळे करण्यात आले होते. हा सगळा कारनामा त्याने केवळ कस्टम ड्युटी वाचवण्यासाठी केला खरा पण त्याला हे सगळं आता चांगलंच महागात पडलं आहे. कारण हे प्रकरण तस्करी अंतर्गत येतं आणि इंडोनेशियामध्ये याबाबत कठोर कायदे आहेत.


Web Title: Indonesia airlines ceo harley davidson on plane got fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.