बोंबला! लग्नाच्या 10 महिन्यांनंतर झाला 'पती'चा भांडाफोड, पुरूष नाही तर महिला निघाला पती!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:01 PM2022-06-21T14:01:23+5:302022-06-21T14:01:53+5:30
Woman Discovers Husband is Actually a Woman : लग्नानंतर महिलेला काही महिन्यांपर्यंत आरोपी महिला फसवत राहिली. आतापर्यंत नवरी सासरच्या लोकांना फसवून लुटत असल्याच्या घटना समोर येत होत्या.
Woman Discovers Husband is Actually a Woman : जगभरात एकापेक्षा एक आश्चर्यकारक घटना घडत असतात. लग्नासारख्या पवित्र नात्यातही आजकाल खूप फ्रॉड बघायला मिळत आहेत. असे असे किस्से समोर येतात की, हैराण व्हायला होतं. इंडोनेशियातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. इथे महिलेला लग्नाच्या 10 महिन्यांनंतर समजलं की, ज्याच्यासोबत पुरूष समजून तिने लग्न केलं, तो मुळात महिला आहे.
डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, लग्नानंतर महिलेला काही महिन्यांपर्यंत आरोपी महिला फसवत राहिली. आतापर्यंत नवरी सासरच्या लोकांना फसवून लुटत असल्याच्या घटना समोर येत होत्या. पण इथे आरोपी महिलेने पूर्ण परिवाराला आणि नवरीलाही 10 महिने अंधारात ठेवलं.
आरोपी महिलेचं नाव Erayani आहे. तर पीडित महिलेच्या नावाचा खुलासा केलेला नाही. Erayani ने 3 महिन्यांच्या बोलणीनंतर पीडित महिलेसोबत लग्न केलं आणि तिच्याच घरात राहू लागला. प्रेमात पडलेल्या पत्नीला आपल्या पतीवर म्हणजे Erayani वर संशयही आला नाही. पण तिच्या आई-वडिलांना काहीतरी गडबड वाटली. Erayani ना नोकरीबाबत काही सांगत होती ना काही मोकळेपणाने बोलत होती. यादरम्यान ती नेहमीच पीडित महिलेकडे पैसे मागत होती. जेव्हा महिलेच्या घरातील लोकांचे प्रश्न वाढू लागले तेव्हा आरोपी महिला पीडित महिलेसोबत दुसरीकडे शिफ्ट झाली. दोघे सोबत राहू लागले.
आरोपी महिला Erayani ने पीडित महिलेला परिवारापासून दूर केलं. तिला घरात कैद करून ठेवलं आणि तिला कुणासोबतही बोलू देत नव्हती. अखेर महिलेच्या परिवाराने पोलिसांना याची माहिती दिली आणि हे पूर्ण प्रकरण समोर आलं. पोलिसांनी काही वेळातच Erayani ला शोधून काढलं. तेव्हा सगळेच हैराण झाले. ज्या Erayani ला पीडित महिला पती समजत होती ती तर महिला निघाली आणि तिने फसवणूक करून लग्न केलं होतं. 10 महिन्यात तिने 15 लाखांपेक्षा जास्त पैसे घेतले होते. पुढील चौकशी सुरू आहे.