"वाऱ्याची झुळूक आली अन् मी गरोदर राहिले; तासाभरात बाळंत झाले"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 02:44 PM2021-02-17T14:44:08+5:302021-02-17T14:47:18+5:30
इंडोनेशियातील महिलेचा अजब दावा; संपूर्ण शहरात बाळंतपणाची चर्चा
इंडोनेशियातील पोलीस सध्या एका विचित्र घटनेचा तपास करत आहेत. वाऱ्याची झुळूक आल्यानं गरोदर राहिल्याचा अजब दावा एका महिलेनं केला आहे. महिलेचा दावा ऐकून डॉक्टर चक्रावले आहेत. सिती झैनाह असं महिलेचं नाव असून ती २५ वर्षांची आहे. झैनाहची तक्रार ऐकून पोलीस बुचकळ्यात पडले आहेत.
तिच बाप अन् तिच माय; आधी स्वत:चं सीमन फ्रिज केलं; आता लिंगबदल करून आई होणार
वाऱ्याची झुळूक आली आणि त्यामुळे मी गरोदर राहिले. त्यानंतर तासाभरातच मी बाळंत झाले, असा अजब दावा सितीनं केला. सितीनं एका मुलीला जन्म दिला असून बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत. इंडोनेशियातल्या पश्चिम जावा प्रांतातल्या सिआनजुरमध्ये ही घटना घडली. 'घराच्या हॉलमध्ये असताना खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली. त्यानंतर १५ मिनिटांनी माझ्या पोटात दुखू लागलं. पोटदुखी हळूहळू वाढतच गेली,' असं सितीनं स्थानिक माध्यमांना सांगितलं.
बाबो! ४ महिन्यांच्या या गायीला मिळाली २ कोटी रूपये किंमत, पण का?
'पोटदुखी वाढत असल्यानं मी दवाखान्यात गेले. तिथे मी बाळंत झाले. मी एका मुलीला जन्म दिला', असं सितीनं माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. संपूर्ण प्रकार अवघ्या काही तासांत घडल्याचा दावा सितीनं केला. 'दुपारच्या प्रार्थनेनंतर मी बिछान्यावर झोपले होते. त्यावेळी खिडकीतून आलेली वाऱ्याची झुळूक माझ्या गुप्तांगात गेल्याचं मला जाणवलं. त्यानंतर पोटदुखी सुरू झाली,' अशी माहिती सितीनं दिली.
कौतुकास्पद! दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मराठमोळ्या तरूणानं यशस्वी सर केला लिंगाणा किल्ला
वाऱ्याची झुळूक आल्यानं गरोदर राहिल्याचं आणि अवघ्या तासाभरात बाळंत झाल्याचं वृत्त काही वेळातच शहरात पसरलं. त्यानंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. सितीनं या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. त्यानंतर कम्युनिटी क्लिनिकचे संचालक इमॅन सुलेमान यांनी प्रकरणाची अधिक माहिती घेतली. महिलेनं मुलीला जन्म दिला असून तिचं वजन २.९ किली आहे. बाळाची प्रकृती उत्तम आहे, असं सुलेमान यांनी सांगितलं. काही वेळा महिलांना त्या गरोदर असल्याचं समजत नाही. प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतरच ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते, असं ते पुढे म्हणाले.