डॉक्टर ५० व्या वर्षी मुलाच्या शिक्षिकेसोबत गुपचूप करत होते दोनाचे चार; पहिली बायको घेऊन आली 'वरात'; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 02:03 PM2021-06-20T14:03:04+5:302021-06-20T14:05:15+5:30

डॉक्टर आणि शिक्षिकेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; पोलिसांकडून चौकशी सुरू

indore father of two children was doing second marriage in indore the first wife thrashed | डॉक्टर ५० व्या वर्षी मुलाच्या शिक्षिकेसोबत गुपचूप करत होते दोनाचे चार; पहिली बायको घेऊन आली 'वरात'; अन् मग...

डॉक्टर ५० व्या वर्षी मुलाच्या शिक्षिकेसोबत गुपचूप करत होते दोनाचे चार; पहिली बायको घेऊन आली 'वरात'; अन् मग...

Next

इंदूर: प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरसोबत असाच प्रकार घडला आहे. ५० वर्षांचे डॉक्टर स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी एका हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाचे विधी सुरू होते. तितक्यात तिथे डॉक्टरांची पत्नी तिच्या ३ मुलांसह पोहोचली. लग्न मांडवात एचकच गोंधळ झाला. लग्न विधी अपूर्णच राहिले आणि 'वरात' थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी वधू, वराला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.

तीन दिवस पहिलीसोबत, तीन दिवस दुसरीसोबत; अन् रविवारी...; पोलिसांसमोरच दोघींनी केली दादल्याची वाटणी

इंदूरमध्ये वास्तव्यास असलेले जितेंद्र दागी होमियोपॅथिक डॉक्टर आहेत. ते घरीच क्लिनिक चालवतात. त्यांना एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. दीड वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झालं आहे. डॉक्टरांचा एक मुलगा बारावीत शिकतो. त्यालाच शिकवण्यासाठी एक शिक्षिका घरी यायची. ही महिला एका खासगी शाळेची मुख्याध्यापिका असल्याचंदेखील समजतं.

शनिवारी भंवरकुआ येथील एका हॉटेलमध्ये डॉक्टर आणि त्यांची प्रेयसी असलेली शिक्षिका यांचा विवाह होता. लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली. त्यानंतर ती तिच्या मुलांसह नातेवाईकांना घेऊन मांडवात पोहोचली. लग्न मंडपात एकच गोंधळ झाला. डॉक्टर आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले.

बाबो! एकाच मंडपात दोन नवरींसोबत एका नवरदेवाने केलं लग्न, सारं गाव बघण्यासाठी जमलं

पहिल्या पत्नीनं डॉक्टर आणि शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. घरात संपत्तीवरून वाद सुरू असल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. कुटुंबियांच्या परवानगीनं दुसरं लग्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न कसं करता, असा प्रश्न पोलिसांनी त्यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही.
 

Web Title: indore father of two children was doing second marriage in indore the first wife thrashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.