सावधान! 'या' छोट्याशा किड्यामुळे महिला मृत्यूच्या दारात; 13 वर्षे वेदनेने विव्हळतेय अन् आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 01:39 PM2022-12-27T13:39:51+5:302022-12-27T13:40:48+5:30
एक छोटासा किडा माणसाचं आयुष्य वेदनेने भरून टाकू शकतो, याची कल्पना कोणीही करू शकत नाही, पण हे एका महिलेसोबत घडलं आहे.
डास आणि इतर लहान कीटकांमुळे अनेकदा आपण हैराण होतो. काही वेळा एखाद्या लहान किडा देखील निरोगी व्यक्तीला मृत्यूच्या दारापर्यंत नेऊ शकतो. डास आपल्याला माहीत आहेत, पण असे काही किडे असे आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते. असाच एक धक्कादायक प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. ज्यामुळे ती मृत्यूशी झुंज देत आहे.
एक छोटासा किडा माणसाचं आयुष्य वेदनेने भरून टाकू शकतो, याची कल्पना कोणीही करू शकत नाही, पण हे एका महिलेसोबत घडलं आहे. या महिलेची कहाणी समजल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. जोर्जा ऑस्टिन नावाच्या महिलेने आपली ही वेदनादायी कहाणी लोकांना सांगितली, जेणेकरून भविष्यात एखाद्या किड्याकडे कोणीही दुर्लक्ष न करता ही बाब गांभीर्याने घ्यावी.
2009 मध्ये जोर्जा ऑस्टिन तिच्या बागेत काम करत होती. त्याचवेळी तिला एक साधा दिसणारा किडा चावला. कीटक चावल्यानंतर तिच्या पायाला सूज आणि लालसरपणा दिसून आला. महिलेच्या एका पायाला चार पिनहोलसारखे चावे दिसत होते, जे बरे होण्यास बराच वेळ लागत होता. आधी तिला वाटलं की आयरनच्या कमतरतेमुळे असं होत आहे, परंतु नंतर कळलं की ही बाब गंभीर आहे. पायोडर्मा गँग्रेनोसम नावाची दुर्मिळ कंडीशन झाली होती, जो एक वेदनादायक त्वचा रोग आहे. तिच्या पायातून पू येत होता आणि तिची तब्येत बिघडत होती.
मिररच्या रिपोर्टनुसार, महिलेची प्रकृती बिघडत असल्याने तिला या वर्षाच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. तिला वाटलं की आता दोन्ही पाय कापावे लागतील, मग एक चमत्कार घडला आणि ती बरी होऊ लागली. 13 वर्षांनंतर तिला पुन्हा ख्रिसमस साजरा करता आला. जोर्जाची ही अवस्था झाली ती नॅट नावाच्या किटकामुळे. भारतात या किड्याला कुटकी किंवा भुंगा म्हणतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.