लय भारी! डिलिव्हरी बॉय बनून स्वप्न पूर्ण केलं, हजारोंना विकली जातेय 'त्या' नं बनवलेली सायकल
By manali.bagul | Published: October 6, 2020 07:59 PM2020-10-06T19:59:08+5:302020-10-06T20:18:27+5:30
शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक वेगवेगळी मशिन्स तयार केली आहेत. अलिकडे आपल्या मित्रांच्या सहकार्याने इंद्रजीतने मल्टी पर्पज ड्रोन तयार केला आहे.
(Image Credit- NBT)
इच्छा तेथे मार्ग असं तुम्ही पहिल्यापासून ऐकत आला असाल. याचचं उभेउभं उदाहरण असलेल्या तरूणाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. झारखंडच्या सिंहभूम परिसरातील इंद्रजीत हा पदवीधर विद्यार्थी आहे. लहानपणापासूनच इंद्रजीतला मशिन्सची खूप आवड होती. या आवडीमुळे आतापर्यंत त्याने अनेक अविष्कार त्याने केले आहेत. पर्वतीय भागात मुलांना पायी चालण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत होता. हीच समस्या लक्षात घेत इंद्रजीतने सोलर सायकल तयार केली आहे. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक वेगवेगळी मशिन्स तयार केली आहेत. अलिकडे आपल्या मित्रांच्या सहकार्याने इंद्रजीतने मल्टी पर्पज ड्रोन तयार केला आहे.
कोणतीही जागा सॅनिटाईज करण्यासाठी तसंच औषधं डिलिव्हर करण्यासाठी हा ड्रोन फायदेशीर ठरतो.
बेटर इंडीयाने दिलेल्या माहितीनुसार इंद्रजीतचे बाबा बस चालक आहेत. आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे इंद्रजीतच्या भावंडांना सरकारी शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. सुरूवातीपासूनच इंद्रजीत शाळेतील विज्ञान उपक्रमांमध्ये सहभाग घेत होता आणि पाहता पाहता त्याने आपले वर्कशॉप तयार केले.
तयार केली सोलार सायकल
एकदा इंद्रजीतला सोलार सायकल मिळाली होती. या सायकलचे तंत्र समजून घेऊन त्याने सायकल तयार करायला सुरूवात केली. जवळपास ३ हजार रुपयांमध्ये ही सायकल तयार केली होती. ही सायकल दोन पद्धतीने चालू शकते. सोलार पॅनेलच्या साहाय्याने ही सायकल ३० किमी चालते तर इलेक्ट्रीक चार्जिंगने ६० कमी चालते. आपला अभ्यास आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने इंद्रजीतने डिलिव्हरी बॉयचे पार्ट टाईम काम करायला सुरूवात केली. दीड हजार वर्ष जुन्या पेटीत बंद होती ममी; अन् उघडल्यावर दिसलं 'असं' काही, पाहा व्हिडीओ
या कामासाठी त्याने स्वतः तयार केलेल्या सोलार सायकलचा वापर करायला सुरूवात केली. एकदा त्याने आपल्या सायकल बनवण्याचा व्हिडीओ युट्यूबवर टाकला आणि ऑर्डर्स मिळायला सुरूवात झाली. या सायकलची विक्री १४ हजार रुपयांना होत आहे. या सायकलमध्ये २४ वॉल्टची बॅटरी असून आतापर्यंत ८० ऑर्डर्स इंद्रजीतला मिळाल्या आहेत. याशिवाय अजून एका संशोधनावर काम सुरू आहे. Video : ऐन गर्दीच्या वेळी अचानक सुपर मार्केटचं सिलिंग कोसळलं; अन्....पाहा थरारक व्हिडीओ