वाह रे पठ्ठ्या! एकेकाळी लग्नांमध्ये डिजे वाजवायचा; अन् आता १५ कोटींच्या बिजनेसचा मालक, थक्क करणारा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 08:10 PM2020-09-10T20:10:11+5:302020-09-10T20:17:48+5:30
मेहनत आणि कष्टाच्या जोरावर या तरूणानं तब्बल १५ कोटींचा व्यवसाय उभा केला आहे.
(Image credit- NBT)
जर करायचं ठरवलं तर व्यक्ती काहीही करू शकते. त्यासाठी जिद्द आणि चिकाटी ठेवण्याची गरज असते. काहीही अशक्य असं नसतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका होतकरू तरूणाबद्दल सांगणार आहोत. या तरूणाची प्रेरणादायी कहाणी ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. हरियाणाचा रहिवासी असलेला अरविंद हा ५० रुपयांकरीता मजूरीचं वाजवण्याचं काम करायचा. पण मेहनत आणि कष्टाच्या जोरावर या तरूणानं तब्बल १५ कोटींचा व्यवसाय उभा केला आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वयाच्या १६ व्या वर्षापासून अरविंदनं नोकरी करण्यास सुरूवात केली. अरविंदचे वडिल कॉन्ट्रॅक्टरचं काम करत होते. घरची परिस्थिती अनुकूल होती. सारं काही व्यवस्थित सुरू होतं. अचानक वडिलांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागल्यानं घरासह अनेक गोष्टी विकण्याची वेळ आली. म्हणून घराला हातभार लावण्यासाठी अरविंदनं काम करायला सुरूवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षी ५० रुपये रोज असलेले काम अरविंदनं करायला सुरूवात केली.
कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी बरी नसल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करण्याचे अरविंदनं ठरवलं. आपल्या आजूबाजूला असलेल्या वादक आणि संगितकारांशी त्यांनी संपर्क केला. त्यानंतर मैत्री झाली. गायक आणि संगितकार, वादक मंडळींसोबत उठणं बसणं सुरू झालं. त्याचे मित्र डीजे वाजवून चांगले पैसे मिळवत होते. हे पाहून अरविंदनेही डीजेचं काम शिकून घेतलं. हळूहळू त्याला प्रसिद्धी मिळायला सुरूवात झाली. एकवेळ अशी आली की लोक पार्टी, लग्न सोहळ्यांसाठी डीजे वाजवण्याासाठी त्यांच्याशी संपर्क करू लागले.
२०१३ पर्यंत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली झाली. त्यानंतर अरविंदनं एल्यूमिनियमचा ट्रसचा व्यवसाय सुरू केला. मोठमोठ्या व्यापारी लोकांशी चर्चा सुरू होत्या. १० लाख रुपये गुंतवून त्यानं आपला नवीन व्यवसाय सुरू केला. इवेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील लोकांशी ओळखी असल्यामुळे या व्यवसायाचा अरविंदला फायदा झाला. अरविंद यांच्या कंपनीचे नाव डेविल आहे. दरवर्षी जवळपास १५ कोटी रुपयांचा व्यापार केला जातो. २०१९ मध्ये डेविल कंपनीला सर्वश्रेष्ठ ट्रेसिंग कंपनीचा पुरस्कार मिळाला होता. कोरोनाच्या माहामारीचा या व्यवसायावर परिणाम झाला असला तरी अरविंद त्यांना पुन्हा सगळं काही व्यवस्थित होण्याची आशा आहे. अरविंद यांनी कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायक ठरली आहे.
हे पण वाचा-
जिद्दीला सलाम! UPSC त पाच वेळा नापास झाला; अन् सहाव्यांदा यशस्वी होऊन IAS अधिकारी बनला
हाताने नाकावरचे पिंपल्स फोडणं चांगलंच अंगाशी आलं; मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन अन् मग...
बाबो! ज्याला हत्येप्रकरणी सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा 'तो'च खासदार झाला; अन् मग.....