क्या बात! कामाठीपुऱ्यात जन्मलेली मुलगी अमेरिकेसाठी ठरली प्रेरणादायी, २५ प्रभावशाली महिलांमध्ये समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 01:34 PM2021-07-03T13:34:59+5:302021-07-03T13:42:04+5:30
मुंबईच्या रेड लाइट एरियात जन्माला आलेल्या श्वेतामध्ये शिकण्याची खूप आवड होती. ज्यामुळे नर्क म्हटल्या जाणाऱ्या रेड लाइट एरियातून बाहेर पडून तिने अमेरिकेतील सर्वात महागड्या कॉलेजसाठी उड्डाण घेतलं आहे.
(Image Credit : Facebook/Stories Of Mumbai)
कमळ हे चिखलात फुलतं पण ते सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं. असंच काहीसं श्वेता कट्टी नावाच्या या तरूणीसोबत झालं आहे. श्वेता कट्टी नावाच्या मुलींची सध्या जोरदार चर्चा होत आहे. आता तुम्ही म्हणाल का? तर तिची प्रेरणादायी कहाणी वाचून तुम्हीही तिचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. आता दुनिया तिला सलाम करत आहे.
मुंबईच्या रेड लाइट एरियात जन्माला आलेल्या श्वेतामध्ये शिकण्याची खूप आवड होती. ज्यामुळे नर्क म्हटल्या जाणाऱ्या रेड लाइट एरियातून बाहेर पडून तिने अमेरिकेतील सर्वात महागड्या कॉलेजसाठी उड्डाण घेतलं आहे. चला जाणून घेऊ १८ व्या वयात २८ लाखांची स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेला जाणाऱ्या श्वेताची कहाणी.
रेड लाइट एरिया ते अमेरिका...
'इंडिया टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, श्वेता कट्टीचा जन्म मुंबईतील रेड लाइट एरिया कामाठीपुऱ्यात झाला. याच वस्तीत ती वाढली. कामाठीपुरा हा आशियातील प्रसिद्ध रेडलाइट एरिया आहे. श्वेता तीन बहिणींमध्ये सर्वात छोटी आहे. ज्या ठिकाणी श्वेता राहते ते ठिकाण शिक्षण आणि स्वप्न बघण्याच्या अनुकूल नाही. पण श्वेताने स्वप्न बघण्याची हिंमत केली. श्वेताचं बालपण सेक्स वर्कर्समद्ये गेलं. त्यांनीच तिला शिक्षणासाठी प्रेरित केलं. त्यांनीच तिला तेथून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाची साथ धरण्यास सांगितलं.
तीनवेळा झालं लैंगिक शोषण
कामाठीपुऱ्या राहत असलेला श्वेताचा परिवार तिच्या आईच्या कमाईवर चालतो. बरेच दिवस ती ५५०० रूपये महिन्याने एका फॅक्टरीत काम करत होती. म्हणायला तर श्वेताचे वडिलही होते. पण ते सावत्र होते आणि दारोडे होते. श्वेतानुसार, तिचे वडील नेहमीच घरात मारझोड- भांडणं करत होते. जोपर्यंत ते सोबत होते तोपर्यंत श्वेताला कधीच चांगलं वाटलं नाही. श्वेताने बालपणीच अनेक गोष्टी सहन केल्या होत्या. बालपणीच ती तीनदा लैंगिक शोषणाचा शिकार झाली होती. तेव्हा ती ९ वर्षांची होती. श्वेताची तिच्या रंगावरूनही अनेकदा खिल्ली उडवली गेली. तिने सांगितलं की, तिला शाळेत इतर विद्यार्थी शेण म्हणून हाक मारायचे.
(Image Credit : Financial Times)
सापडला नवा मार्ग
श्वेताला खूप काही करायचं होतं, पण त्याला काही मदत मिळत नव्हती. तिचा आत्मविश्वासही कमी झाला होता. अशात ती कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यास घाबरत होती. पण ते म्हणतात ना की, जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्गही सापडतो. १६ वर्षीय श्वेताला मार्ग तेव्हा सापडला जेव्हा तिने २०१२ मध्ये क्रांति नावाची एक एनजीओ जॉइन केली. इथूनच तिच्या जीवनात नवा टर्न आला. ज्या परिस्थितीत श्वेता मोठी झाली, त्यामुळे ती स्वत:चा राग करत होती. पण या संस्थेने तिला स्वत:वर प्रेम करायला शिकवलं.
२५ महिलांच्या यादीत समावेश
श्वेताच्या कौतुकास्पद प्रयत्नांमुळे अमेरिकेची मॅगझीन न्यूजवीकने २०१३ मध्ये तिला आपल्या एप्रिलच्या अंकात २५ वयापेक्षा कमी अशा २५ महिलांच्या यादीत स्थान दिलं होतं, ज्या समाजासाठी प्रेरणास्त्रोत बनल्या. याच यादीत पाकिस्तानच्या मलाला युसुफजई हिचंही नाव होतं. यानंतर श्वेताला असं काही मिळालं ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. अमेरिकेतील १० सर्वात महागड्या कॉजेलपैकी एक मानल्या जाणाऱ्या बार्ड कॉलेजची स्नातक डिग्रीची फी जवळपास ३० लाख रूपये होती. श्वेताला इथे शिकण्यासाठी २८ लाख रूपयांची स्कॉलरशिप मिळाली आहे.
कशी मिळाली स्कॉलरशिप
श्वेताच्या इच्छाशक्ती आणि मेहनतीमुळे हे शक्य होऊ शकलं होतं. ती सतत इंटरनेटवर अमेरिकन विश्वविद्यालयाबाबत सर्च करत होती. यादरम्यान तिचं बोलणं बार्ड कॉलेजच्या एका माजी विद्यार्थ्यासोबत झालं. तो विद्यार्थी श्वेतावर इतका प्रभावित झाला की, त्याने बार्ड कॉलेजमध्ये श्वेताची शिफारस केली. श्वेताच्या कहाणीने कॉलेजमधील अधिकाऱ्यांचं मन हेलावून गेलं. बाकी काम न्यूजवीक मॅगझीनने केलं. ज्यात श्वेता २५ श्रेष्ठ महिलांमध्ये निवडली गेली होती. याच कारणांमुळे तिला स्कॉलरशिप मंजूर झाली.