बापरे! मानवी हाडांपासूनच तयार केली बॅग, किंमत वाचून व्हाल अवाक्....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 04:08 PM2020-04-15T16:08:08+5:302020-04-15T16:36:05+5:30
आपल्या ग्लॅमरस फोटोमुळे हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. अर्नोल्डने २०१६ मध्ये अमेरिकेत ही बॅग तयार केली.
मुलींना बॅग्स घ्यायची खूप आवड असते. वेगवेगळ्या ड्रेसवर मॅच होत असलेल्या बॅग्स मुलींना हव्या असतात. स्टाईलिश आणि तितकंच सिंपल अशा बॅग्स महिलांना पसंत असतात. आज आम्ही तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या बॅगबद्दल सांगणार आहोत.
एका प्रसिद्ध आणि श्रीमंत डिजायनरने मानवी हाडांपासून हॅण्डबॅग तयार केली आहे. या बॅगची किंमत वाचून तुम्ही नक्की विचारात पडाल. इंडोनेशियाच्या या व्यक्तीने कॅनडामधून मानवी हाडांची खरेदी केली. परंतू यासंबंधीत कागदपत्रं दाखवण्यास त्याने नकार दिला आहे. म्हणून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
या डिजायनरचं नाव अर्नोल्ड पुल्ट्रा आहे, आपल्या ग्लॅमरस फोटोमुळे हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. अर्नोल्डने २०१६ मध्ये अमेरिकेत ही बॅग तयार केली.
एका मुलाखतीत अर्नोल्डने सांगितलं होतं की, प्रायव्हसीच्या कारणांमुळे तो मानवी हाडं घेतल्याची कागदपत्र दाखवू शकत नाही. सोशल मीडियावर या बॅगविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या बॅगची मार्केटिंग आयडिअल स्टेटमेंट पीस यावर आधरीत केली जात आहे. या बॅगची किंमत ३ लाख ८१ हजार इतकी आहे. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार अर्नोल्डने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या बॅगबद्दल माहिती दिली आहे.
मानवी सांगाड्यांपासून ही बॅग तयार केली आहे. त्यात सोशल मीडिया अकाऊंट अर्नोल्ड एकटा हॅण्डल करत नाही तर संपूर्ण टीम याचं काम पाहते.