तरूण आणि आकर्षक दिसण्यासाठी स्वत:चं रक्त पिते ही मॉडल, अनेक पोस्टमधून केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 09:52 AM2024-02-24T09:52:04+5:302024-02-24T09:54:07+5:30
तुम्हाला कुणी सांगितलं की, तरूण दिसण्यासाठी 'रक्त' वापरलं जातं तर यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे.
हॉट आणि तरूण दिसण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. चेहऱ्याची चमक कायम रहावी आणि तरूण दिसावं म्हणून लोक बोटोक्सपासून ते सर्जरीचाही आधार घेतात. अशात तुम्हाला कुणी सांगितलं की, तरूण दिसण्यासाठी 'रक्त' वापरलं जातं तर यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे.
तरूण दिसण्यासाठी एक अनोखी टेक्नीक सोफिया क्लेरीसी नावाच्या एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि मॉडलने काढली आहे. इन्स्टावर तिचे 2.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत असते. सोफियाने जो दावा केला तो हैराण करणारा आहे.
सोफिया म्हणाली की, ती वाढत्या वयात तरूण दिसण्यासाठी स्वत:चं रक्त पिते. सोशल मीडियावर व्हायरल एका पोस्टमध्ये सोफियाने कबूल केलं की, ती तरूण दिसण्यासाठी तिचंच रक्त पिते. सोफियाने एक फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आणि बॅकग्राउंडला गर्द लाल रंगाचं पेय त्यात दिसतं.
सोफियाच्या या फोटोवर एका फॅनने प्रश्न विचारला. यावर सोफियाने जे उत्तर दिलं ते ऐकून फॅनशिवाय इतर लोकही हैराण झाले. सोफियाने पुन्हा एक फोटो शेअर केला. या फोटोत तिने एका ग्लासचा क्लोजअप दाखवला ज्यावर रक्त लागलेलं दिसत आहे.
या फोटोला सोफियाने अजब कॅप्शन दिलं होतं. तिने लिहिलं होतं की, 'मी माझं रक्त आणते आणि ते याला माझ्यासाठी लेमोनेडमध्ये मिक्स करतात'. सोफियाच्या फोटोवर लागोपाठ रिअॅक्शन्स येत होते. तिने कॉस्मेटिक्स बॅगचा एक फोटो टाकला होता. ज्यात 'रक्ताची' एक ट्यूब दिसत आहे. याच्या कॅप्शनला तिने लिहिलं होतं की, हे त्यांच्यासाठी आहे जे माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.
आता यात किती तथ्य आहे याचा दावा आम्ही करत नाही. पण सोफिया नेहमीच आपल्या पोस्ट्सच्या माध्यमातून रक्त पिण्याचा दावा करत असते. ज्यामुळे लोकही अवाक् झाले आहेत आणि यावर कमेंट्स करत असतात.