एक असं गाव जिथे कधीच पाऊस पडत नाही, कारण वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 12:35 PM2021-07-01T12:35:36+5:302021-07-01T12:38:19+5:30
तुम्हाला अशा ठिकाणाबाबत माहीत आहे का जिथे कधीच पाऊस पडत नाही. हे ठिकाण काही वाळवंट नाही. हे एक गाव आहे तिथे लोक राहतात.
देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनने धडक दिली आहे आणि पाऊसही सुरू आहे. हवामान खात्याकडून सतत पावसाचे अलर्ट दिले जात आहेत. काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी नाही. मात्र, जगात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे वर्षभर सर्वात जास्त पाऊस पडतो. जसे की, मेघालयातील मासिनराम गाव. इथे जगात सर्वात जास्त पाऊस होतो. पण तुम्हाला अशा ठिकाणाबाबत माहीत आहे का जिथे कधीच पाऊस पडत नाही. हे ठिकाण काही वाळवंट नाही. हे एक गाव आहे तिथे लोक राहतात.
कधीच पाऊस न पडणाऱ्या या यमनमधील गावाचं नाव आहे अल-हुतैब. हे गाव समुद्र सपाटीपासून ३,२०० मीटर उंचीवर आहे. गावाच्या चारही बाजूचं वातावरण मुळात फार गरम आहे. मात्र हिवाळ्यात सकाळी इथे फार थंड वातावरण असतं. पण जसाही सूर्य डोकं वर काढतो लोकांना उष्णतेचा सामना करावा लागतो.
ग्रामीण आणि शहरी विशेषत: सोबत प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेला जोडणारं हे गाव आता अल-बोहरा किंवा अल-मुकरमा लोकांचा गढ आहे. त्यांना यमनी समुदाय असंही म्हटलं जातं.
यमनी समुदायातील लोक मुहम्मद बुरहानुद्दीन यांच्या नेतृत्वातील इस्लाम समुदायातील आहेत. ते मुंबईत राहत होते. २०१४ मध्ये मृत्यू होईपर्यंत ते दर तीन वर्षांनी या दावाचा दौरा करत होते.
या गावाची खास बाब म्हणजे इथे कधीच पाऊस पडत नाही. याचं कारणंही तेवढं खास आहे. या गावात पाऊस पडत नाही कारण हे गाव ढगांच्या वर आहे. म्हणजे ढग या गावाच्या खालीच तयार होता. इतकं हे गाव उंचीवर आहे. येथील नजारा असा आहे जो दुसरीकडे कुठे बघायला मिळणार नाही.