जुळ्या मुलांची राजधानी असलेल्या 'या' प्रदेशाबद्दल माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 05:45 PM2020-04-23T17:45:59+5:302020-04-23T17:59:01+5:30

या ठिकाणच्या सांस्कृतीक जीवनाची सुरूवात इ.स पूर्व ९००० मध्ये सुरू झाल्याचं मानलं जातं.

Interesting facts about nigeria a country in west africa MYB | जुळ्या मुलांची राजधानी असलेल्या 'या' प्रदेशाबद्दल माहीत आहे का?

जुळ्या मुलांची राजधानी असलेल्या 'या' प्रदेशाबद्दल माहीत आहे का?

Next

(image credit- Dainik bhaskar)

नायझेरियाला फेडेरेल रिपब्लिक ऑफ नायझेरिया नावाने ओळखलं जातं. आफ्रिकेतील बेटांच्या पश्चिमेला हा देश आहे. आफ्रिकेतील तिसरी सगळ्यात लांब नदी नायझर आहे. या नदीच्या नावावरून या देशाचं नाव नायझेरिया ठेवण्यात आलं. या ठिकाणच्या सांस्कृतीक जीवनाची सुरूवात इ.स पूर्व ९००० मध्ये सुरू झाल्याचं मानलं जातं. या देशाच्या पुरातन साहित्यात याची नोंद असल्याचं स्थानिक लोकांच मत आहे. आज आम्ही तुम्हाला याच देशाच्या माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. 

नायझेरियातील 'इगबो-ओरा' शहर जुळ्या मुलांची राजधानी म्हणजेच 'ट्वीन टाउन  म्हणून ओळखलं जातं. कारण या ठिकाणी जगातील सर्वाधिक जुळ्या मुलांचा जन्म होतो. प्रत्येकी १००० मुलांमध्ये १५८ जुळी मुलं जन्माला येतात. 

नायझेरियाची चित्रपटसुष्टी नॉलीवूड या नावाने ओळखली जाते. जगभरातील सगळ्यात जास्त चित्रपट बनवण्यासाठी द्वितीय क्रमांकावर आहे. नॉलीवूडमध्ये प्रत्येक आठवड्यात कमीतकमी ५०  चित्रपट तयार केले जातात.

जोस प्लेट्यू इंडिगोबर्ड' नावाच्या पक्षाच्या प्रजाती या ठिकाणी दिसून येतात. याव्यतिरिक्त प्राण्यांच्या सगळ्यात  दुर्मीळ प्रजाती असलेले माकडं आणि लोलँड गोरिल्ला नायझेरियाव्यतिरिक्त इतर ठिकाणी दिसून येत नाहीत. 

(Image credit-pixabay)

तुमचा विश्वास बसणार नाही पण जगभरात बोलल्या जात असलेल्या भाषांपैकी ५०० भाषा नायझेरियात बोलल्या जातात. या देशातील तराबा राज्यात लोक अनेक भाषांमध्ये संवाद साधतात. उर्वरीत नायझेरियाचे लोक इंग्रजीतूनच संभाषण करतात.

नायझेरियातील इडो राज्यात असेलेल वॉल्स ऑफ बेनिन जगभरातील पुरातन वास्तूंपैकी एक आहे. काही तज्ञांच्यामते बेनिनच्या भिंतींची निर्मीती तेराव्या आणि पंधराव्यात शतकाच्या मध्यात करण्यात आली होती. परंतू अद्याप या भिंतींबद्दल ठोस माहिती प्राप्त झालेली नाही.

तसंच जगातील सगळ्यात मोठं विनर्स चैपल चर्च हे सभागृह नायझेरिया मध्ये आहे. यात एकावेळी ५०,००० हजार लोकांना बसवण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. जगभरातील ६५ देशांमध्ये  याच्या शाखा आहेत.

Web Title: Interesting facts about nigeria a country in west africa MYB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.