दोन भागात कापला गेला आहे विशाल दगड, वैज्ञानिकांसाठी आजही आहे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:04 PM2021-10-08T18:04:23+5:302021-10-08T18:08:53+5:30

काही याला निसर्गाची करणी मानतात तर काही लोकांच्या मनात या गोष्टी बघून एलियन्सचा विचार येतो. आज तुम्हाला अशाच एक ठिकाणाबाबत सांगणार आहोत. 

Interesting facts about rock of al naslaa who cut perfectly in half | दोन भागात कापला गेला आहे विशाल दगड, वैज्ञानिकांसाठी आजही आहे रहस्य

दोन भागात कापला गेला आहे विशाल दगड, वैज्ञानिकांसाठी आजही आहे रहस्य

googlenewsNext

जगभरात अशा अनेक विचित्र गोष्टी आहेत ज्यांचं रहस्य आजपर्यंत कुणलाही समजू शकलेलं नाही. जसे की, कुठे समुद्रात गोड पाण्याची विहीर तर कुठे रंग बदलणारे सरोवर. या गोष्टी बघून मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. काही याला निसर्गाची करणी मानतात तर काही लोकांच्या मनात या गोष्टी बघून एलियन्सचा विचार येतो. आज तुम्हाला अशाच एक ठिकाणाबाबत सांगणार आहोत. 

आम्ही तुम्हाला सांगत आहोत सौदी अरबमधील अल नसलाच्या दगडाबाबत. हे दगड पाहून सगळेच हैराण होतात कारण पृथ्वीवर इतक्या मोठ्या दगडाला कापणारी कोणतीही टेक्नीक तयार झालेली नाहीये. या दगडाला समान भागात कापण्यात आलं आहे. 

हेच कारण आहे की, या दगडाला पाहून लोकांच्या मनात एलियन्सचा विचार येतो. अल नसला येथे एक मोठा डोंगर रूपी दगड आहे. ज्याला मधोमध दोन भागात कापण्यात आलं आहे. हा दगड कुणी, कसा कापला याचा आजपर्यंत खुलासा झालेला नाही. 

हा फोटो पाहून लोक म्हणतात की, हे काम केवळ एलियन्सच करू शकतात. नाही तर पृथ्वीवर तर असं होणं अशक्य आहे. तेच याबाबत काही एक्सपर्ट्स सांगतात की, या दगडाला अशाप्रकारे कापणं freeze-thaw weathering चा भाग असू शकतो.
 

Web Title: Interesting facts about rock of al naslaa who cut perfectly in half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.