स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या १५ गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 02:18 PM2019-11-15T14:18:24+5:302019-11-15T14:30:51+5:30
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील किंवा अनेक सिनेमांमध्येही ही विशाल मूर्ती पाहिली असेल. पण याबाबत अनेकांना फार कमी माहीत आहे.
(Image Credit : mentalfloss.com)
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील किंवा अनेक सिनेमांमध्येही ही विशाल मूर्ती पाहिली असेल. पण याबाबत अनेकांना फार कमी माहीत आहे. ती का तयार केली? कुणी तयार केली? किती उंची आहे? असे कितीतरी प्रश्न अनेकांना पडत असतात. त्यांच्या याच प्रश्नांचं उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ४ जुलै १७७६ ला अमेरिकेच्या स्वातंत्र्यानिमित्ताने अमेरिकेसाठी फ्रान्सकडून देण्यात आलेलं एक गिफ्ट होतं. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची निर्मित फ्रान्स आणि अमेरिका दोन्ही देशांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं. यासाठी अमेरिका आणि फ्रान्सच्या सरकारमधे एक करार झाला होता. ज्यानुसार अमेरिकेने या मूर्तीचा पाया उभारला होता तर फ्रान्सने मूर्तीची निर्मिती केली होती. चला
जाणून घेऊ स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या काही खास गोष्टी....
१) स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराच्या मॅनहॅटनमध्ये लिबर्टी बेटावर आहे.
२) फ्रान्सकडून अमेरिकेला भेट देण्यात आलेल्या या तांब्याच्या मूर्तीचं डिझाइन फ्रान्सचे मूर्तिकार फ्रेडरिक ऑगस्ट बार्थोल्दी यांनी तयार केलं होतं. तर ही मूर्ती गुस्ताव एफिलने तयार केली होती.
(Image Credit : en.wikipedia.org)
३) ही मूर्ती फ्रान्समधे जुलै १८८४ मध्ये तयार करण्यात आली होती आणि फ्रान्सहून १७ जून १८८५ ला न्यूयॉर्कला आणण्यात आली होती.
४) फ्रान्सहून ही मूर्ती अमेरिकेला आणताना ३५० तुकड्यांमधे विभागण्यात आली होती आणि २१४ बॉक्समध्ये हे तुकडे ठेवण्यात आले होते. अमेरिकेत आणल्यावर हे तुकडे जोडण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी लागला होता.
५) २८ ऑक्टोबर १८८६ ला तत्कालीन राष्ट्रपती ग्रोवर क्लीवलॅंड यांनी हजारो लोकांसमोर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं अनावरण केलं होतं.
६) जमिनीपासून या मूर्तीची उंची ३०५ फूट आणि ६ इंच आहे.
७) तांब्याच्या प्रतिमेची उंची १५१ फूट आहे.
८) स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं एकूण वजन २२५ टन इतकं आहे.
९) १९८६ मध्ये डागडुजी करताना नव्या मशालीला २४ कॅरेट सोन्याचा मुलामा लावण्यात आला होता.
(Image Credit : realitydecoded.blog)
१०) मूर्तीच्या मुकूटावर ७ किरण आहेत. जे जगातल्या ७ महाद्वीपांचं प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक किरणांची लांबी ९ फूट आहे आणि त्यांचं वजन १५० पाउंड आहे.
११) जर एखाद्या व्यक्तीला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या डोक्यापर्यंत जायचं असेल तर ३५४ पायऱ्या चढून जावं लागतं. मूर्तीच्या आतून मुकूटापर्यंत जाण्यासाठीही रस्ता केला आहे.
१२) मूर्तीच्या डाव्या हातात २३ फूट ७ इंच लांब आणि १३ फूट ७ इंच रूंद पुस्तक आहे. यावर JULY IV MDCCLXXVI असं लिहिलं आहे. हे ४ जुलै १७७६ ही तारीख दर्शवतं.
१३) या स्टॅच्यूच्या पायांमध्ये असलेली तुटलेली साखळी उत्पीडन आणि अत्याचारातून मुक्तीचं प्रतिक आहे.
१४) फ्रान्स आणि अमेरिकेतील लोकांनी हा स्टॅच्यू तयार करण्यासाठी २५०,००० अमेरिकन डॉलर जमा केले होते.
१५) १९८४ मध्ये यूनेस्कोने या मूर्तीला वर्ल्ड हेरिटेज घोषित केलं होतं.