रेल्वेतील फॅनमध्ये अशी काय टेक्निक आहे, ज्यामुळे ते कुणी चोरी करू शकत नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 02:44 PM2022-10-03T14:44:50+5:302022-10-03T14:45:11+5:30
Interesting Facts About Train Fan: रेल्वेत सीटवर झोपल्यावर डोळ्यांसमोर असतो फक्त रेल्वेत दिसणार अनोखा फॅन. या फॅनची बनावट ही टेबल फॅनसारखी असते.
Interesting Facts About Train Fan: भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाईन मानलं जातं. रेल्वेने लाखो लोक रोज प्रवास करतात. रेल्वे लाइन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे ही जगातली चौथी सगळ्या मोठी आणि आशियातील दुसऱ्या नंबरची मोठी सेवा मानली जाते. पैसे आणि सुविधेच्या बाबतीत भारतीय रेल्वे सगळ्यात चांगलं साधन आहे.
रेल्वेचा प्रवास हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी यादगार ठरत असतो. खिडकीतून येणारा थंड वारा, बाहेर दिसणारे डोंगर, गावे पाहून मजा येते. सीटवर झोपल्यावर डोळ्यांसमोर असतो फक्त रेल्वेत दिसणार अनोखा फॅन. या फॅनची बनावट ही टेबल फॅनसारखी असते. पण हा फॅन सुरू होण्यासाठी लागणारा करंट वेगळा असतो. हा करंट वेगळा ठेवण्यात आलाय कारण जेणेकरून ते चोरी होऊ नये.
रेल्वेतून बल्ब, नळाच्या तोट्यांची चोरी होत असते. रेल्वेत अशा चोरी करण्यासाठी कठोर शिक्षा दिली जाते. त्यामुळे रेल्वेतील फॅन चोरी होण्यापासून एका अशा टेक्निकचा वापर करण्यात आलाय ज्यामुळे चोर ते चोरीच करू शकत नाहीत. तरीही कुणी हा फॅन चोरी केलाच तर तो त्याच्या काहीच कामात पडणार नाही.
भारतीय रेल्वेत फॅनमध्ये इंजीनियर्सनी करंटमध्ये हेर-फेर केली आहे. ज्यामुळे हे फॅन फक्त रेल्वेतच चालू शकतात. म्हणजे घरांमध्ये AC (Alternating Current) किंवा DC (Direct Current) ने विजेचा वापर होतो. ज्यातील AC मध्ये 220 व्होल्टचा करंट असतो तर DC मध्ये 5, 12 आणि 24 व्होल्ट.
आता रेल्वेतील फॅनसाठी असं डोकं लावण्यात आलं की, हे फॅन केवळ DC करंटने चालू शकतात. तेही 110 व्होल्टवर. तर घरातील DC करंट हा 5, 12 आणि 24 पेक्षा जास्त होऊ शकत नाही. त्यामुळे रेल्वेतील हे फॅन पुरेसा DC करंट न मिळाल्याने घरात चालू शकत नाहीत. यांचा वापर केवळ रेल्वेत होऊ शकतो.
2021 एका आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेकडून सरासरी दररोज एकूण 1,512 विशेष रेल्वे चालवल्या जातात. त्याशिवाय Suburban Train एकूण 5,387 आणि पॅसेंजर रेल्वे 981 चालवल्या जातात. भारतात साधारण 8 हजार रेल्वे स्टेशन आहेत.