प्रत्येक गाडीच्या टायरचा रंग काळाच का असतो? कधी विचारही नसेल केला या कारणाचा....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:23 PM2021-07-22T15:23:46+5:302021-07-22T15:30:02+5:30

तुम्ही कधी विचार केलाय का की, गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जर तुम्ही कधी याचा विचारच केला नसेल तर आज आम्ही याबाबत आश्चर्यकारक माहिती सांगणार आहोत.

Interesting facts about why tyre colour black, know the reason | प्रत्येक गाडीच्या टायरचा रंग काळाच का असतो? कधी विचारही नसेल केला या कारणाचा....

प्रत्येक गाडीच्या टायरचा रंग काळाच का असतो? कधी विचारही नसेल केला या कारणाचा....

googlenewsNext

बालपणी सायकलपासून सुरूवात होते आणि मोठे झालो की, आपण वेगवेगळ्या गाड्या चालवतो. कधी बाइक, स्कूटी, कार, जीप, ट्रक...गाडी कोणतीही असो काही गोष्टी सेमच असतात. त्यातील एक बाब म्हणजे सर्व गाड्यांचा टायर एकसारखा असतो. भलेही त्यांची साइज वेगळी असेल, पण सर्वांचा रंग एकच असतो. प्रत्येक गाडीच्या टायरचा रंग काळा (Tyre Colour Black Why) असतो. 

पण तुम्ही कधी विचार केलाय का की, गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जर तुम्ही कधी याचा विचारच केला नसेल तर आज आम्ही याबाबत आश्चर्यकारक माहिती सांगणार आहोत. Interesting Facts About Tyre).

या रंगीबेरंगी दुनियेत सर्वच टायरचा रंग काळा असतो.  यामागचं कारणही खास आहे. याकडे टायरच्या मजबूतीला जोडून बघितलं जातं. टायर हे रबरपासून तयार केले जातात. रबराचा रंग पांढरा असतो आणि रबरापासून टायर फार लवकर घासले जात होते. त्यामुळे टायरच्या मजबूतीवर प्रश्न उपस्थित होत होते. 

नंतर रिसर्चमधून समोर आलं की, रबरामध्ये कार्बन आणि सल्फर मिश्रित केले तर टायर मजबूत तयार  केला जाऊ शकतो असं केल्यावर टायरचा रंग पांढऱ्याचा काळा झाला. 

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, साध्या रबराचा टायर साधारण ८ हजार किलोमीटरपर्यंत चालू शकतो. तेच कार्बनयुक्त रबराचा टायर १ लाख किलोमीटरपर्यंत चालू शकतो. कार्बनसोबत यात सल्फरही मिश्रित केलं जातं. यावरून हे स्पष्ट होतं की, टायर बनवण्यासाठी रबरात कार्बन टायर मजबूत होण्यासाठी टाकलं जातं.

लहान मुलांच्या सायकलचे टायर रंगीबेरंगी आणि सुंदर असतात. त्यांच्या टायरसाठी वापरण्यात आलेल्या रबरामध्ये कार्बन नसतं. लहान मुलांचं वजन कमी असतं आणि अशात टायर जास्त मजबूत बनवण्याची चिंता नसते.
 

Web Title: Interesting facts about why tyre colour black, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.