बुर्ज खलीफाचे काच धुण्यासाठी किती वेळ लागतो वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 01:12 PM2023-08-22T13:12:15+5:302023-08-22T13:17:09+5:30
Burj Khalifa : जगातल्या सगळ्यात उंच इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश आहे. ही इमारत धुण्यासाठी किती कालावधी लागतो हे वाचाल तर डोकं चक्रावून जाईल.
Burj Khalifa : दुबई जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. उंचच उंच इमारती, वाळवंटाचा सुंदर नजारा इथे बघायला मिळतो. याच कारणाने दरवर्षी हजारो पर्यटक इथे फिरायला येतात. येथील बुर्ज ख़लीफा टॉवर (Burj Khalifa Tower) हे तर सगळ्यात मोठं आकर्षण आहे आणि दुबईची शान आहे. बुर्ज ख़लीफा इमारत 829.8 मीटर ऊंच आहे. जगातल्या सगळ्यात उंच इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश आहे. ही इमारत धुण्यासाठी किती कालावधी लागतो हे वाचाल तर डोकं चक्रावून जाईल.
बुर्ज ख़लीफा या इमारतीचं निर्माण काम 2004 मध्ये सुरू झालं होतं. ही इमारत बनवण्यासाठी दररोज 12 हजार मजूर काम करत होते. ही इमारत तयार करण्यासाठी A380 विमाना इतकं अॅल्यूमिनिअम आणि एक लाख हत्तींच्या वजनाचं कॉन्क्रीट वापरण्यात आलं. त्याशिवाय ही इमारत तयार करण्यासाठी अंदाजे 1.5 अब्ज डॉलर खर्च करण्यात आला होता.
आकर्षणाचं केंद्र असलेली ही इमारत आयफेल टॉवर पेक्षाही उंच आहे. ज्याची उंची 829.8 मीटर आहे. ही इमारत तयार होण्यासाठी पूर्ण 5 वर्षे लागली. ही इमारत 2009 मध्ये तयार झाली होती. तर 2010 मध्ये सगळ्यांसाठी खुली करण्यात आली होती.
बुर्ज ख़लीफा इमारतीचा बाहेरचा भाग 26,000 काचांनी झाकलेला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हे काच धुण्यासाठी साधारण 3 महिन्यांचा वेळ लागतो. जगातली सगळ्यात उंच इमारत असल्याने या इमारतीच्या नावावर 7 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.
तुम्ही वाचून हैराण व्हाल की, बुर्ज ख़लीफा ही इमारत तुम्ही 95 किमी दूर अंतरावरूनही बघू शकता. अनेकांना हेही माहीत नसेल की, आधी या इमारतीचं नाव बुर्ज दुबई किंवा खलीफा टॉवर ठेवण्यात आलं होतं. नंतर ते बदलून बुर्ज ख़लीफा करण्यात आलं.
बुर्ज ख़लीफामध्ये एकूण 163 मजले आहेत. याच्या 154व्या फ्लोरवर जगतील सगळ्यात उंच Bar आणि Lounge आहे. तसेच यात 58 लिफ्ट, 2957 पार्किंग स्पेस, 304 हॉटेल, 37 ऑफिस फ्लोर आणि 900 अपार्टमेंट आहेत.