लाल रंगाच्या सिलिंडरमध्ये LPG असतो...; मग निळ्या, काळ्या आणि पांढऱ्या सिंलिंडरमध्ये कोणता गॅस असतो? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 12:36 PM2023-05-02T12:36:34+5:302023-05-02T12:37:59+5:30
या वेगवेगल्या रंगांच्या सिलिंडरमध्येन नेमका कोणता गॅस भरला जातो? गॅस तर एकच रंगाच्या सिलिंडरमध्येही भरला जाऊ शकतो, मग वेगवेगळ्यारंगाचे सिलिंडर कशासाठी? तर जाणून घेऊयात...
आपल्या सर्वांच्याच घरातील किचनमध्ये लाल रंगाचे सिलिंडर वापरले जाते. एलपीजी गॅस, अर्थात लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस या लाल रंगाच्या सिलिंडरमध्ये असतो, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, स्वयंपाकघरातील या लाल सिलिंडर व्यतिरिक्त निळ्या, काळ्या आणि पांढऱ्या रंगाचेही सिलेंडर असतात. आता प्रश्न असा निर्माण होतो की, या वेगवेगल्या रंगांच्या सिलिंडरमध्येन नेमका कोणता गॅस भरला जातो? गॅस तर एकच रंगाच्या सिलिंडरमध्येही भरला जाऊ शकतो, मग वेगवेगळ्यारंगाचे सिलिंडर कशासाठी? तर जाणून घेऊयात...
सिलिंडर वेगवेगळ्या रंगात विभागण्याचे कारण -
खरे तर, जगात LPG शिवाय इतर अनेक प्रकारचे गॅस वापरले जातात. लाल रंगाच्या सिलिंडरमध्ये एलपीजी गॅस भरला जातो, हा गॅस केवळ स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी वापरला जातो. मात्र याशिवाय, इतरही अनेक प्रकारचे गॅस आहेत, ज्यांच्यामुळे मानवी जीवन सुसह्य होण्यास मदत होते. एलपीजीच्या बऱ्याच आधीपासून, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन आणि फुग्यात भरला जाणारा हेलियम गॅसही सिलिंडरमध्ये भरला जातो. हे गॅस सिलिंडरमध्ये भरणे अत्यंत सोपे आहे. पण या सर्वच गॅसचे सिलिंडर एकाच रंगाचे असतील तर, मोठी अडचण निर्माण होईल. कारण असे एकाच रंगाचे सिलिंडर एकत्र केले, तर कोणता गॅस कोणत्या सिलिंडरमध्ये भरला आहे, हे कुणीही ओळखू शकणार नाही. यामुळेच गॅस नुसार सिलिंडरचा रंग निश्चित करण्यात आला आहे. जेणेकरून त्या रंगावरून गॅस पटकन ओळखता येईल.
कोणत्या रंगाच्या सिलिंडरमध्ये कोणता गॅस? -
आपल्या सर्वांना माहित आहे की, लाल रंगाच्या सिलिंडरमध्ये एलपीजी गॅस, अर्थात लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस भरलेला असतो. हा गॅस आपण स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी वापरतो. पांढऱ्या रंगाच्या सिलिंडरसंदर्भात बोलायचे झाल्यास, पांढऱ्या रंगाच्या सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरलेला असतो. ऑक्सिजनचे सिलिंडर प्रामुख्याने रुग्णालयांत वापरले जातात.
याच पद्धतीने काळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये नायट्रोजन असतो. याचा वापर आइस्क्रीम बनविण्यासाठी आणि टायरमध्ये भरण्यासाठी केला जातो. तसेच, तपकिरी रंगाच्या सिलेंडरसंदर्भात बोलायचे झाल्यास, यात हेलियम गॅस भरलेला असतो, जो उडणाऱ्या फुग्यांमध्ये भरला जातो. निळ्या सिलेंडरमध्ये नायट्रस ऑक्साईड वायू भरला जातो, याला 'लाफिंग गॅस' असेही म्हणतात. याचबरोबर, राखाडी रंगाच्या सिलिंडरमध्ये कार्बन डायऑक्साइड असतो.