'हा' हुकूमशहा कुणाशीही शेकहॅंड केल्यावर दारूने धुवायचा हात, जाणून घ्या कशी होती त्याची दहशत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:13 PM2019-10-21T12:13:56+5:302019-10-21T12:32:15+5:30
आजपर्यंत जगभरात अनेक हुकूमशहा झालेत. काहींचा इतिहास पसंत केला जातो तर काहींचा इतिहास अजिबात पसंत केला जात नाही.
(Image Credit : Social Media)
आजपर्यंत जगभरात अनेक हुकूमशहा झालेत. काहींचा इतिहास पसंत केला जातो तर काहींचा इतिहास अजिबात पसंत केला जात नाही. अशांपैकीच एक हुकूमशहा म्हणजे रोमानियाचा हुकूमशहा निकोलस चाचेस्कू. चाचेस्कूने लागोपाठ २५ वर्ष देशावर राज्य केलं आणि लोकांच्या मनात अशी भिती निर्माण केली की, ते त्याच्या विरोधात काही बोलत नव्हते आणि मीडियाही काही बोलत नव्हता. त्याने त्याचा इतिहास बनवण्याचा प्रयत्न केला, पण आज रोमानियाचा इतिहासच त्यांना पसंत करत नाही.
तशी तर आजही अनेक हुकूमशहांची चर्चा केली जातं. पण निकोलस चाचेस्कूसारखा कुणी नाही झाला. असे म्हटले जाते की, ६०-७० दशकात चाचेस्कूने सर्वसामान्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचं एक गोपनिय पोलीस दल तयार केलं होतं. जे लोकांच्या खाजगी जीवनावर लक्ष ठेवत होतं.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, रोमानियामध्ये भारताचे राजदूत राहिलेले राजीव डोगरा यांनी सांगितले की, चाचेस्कूच्या काळात बागेत बसलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी तिथे एक गुप्तहेर बसलेला असायचा. लोकांना कळू नये म्हणून तो पेपरमध्ये एक छिद्र करू लोकांकडे बघत असेल.
राजीव डोगरा यांच्यानुसार, चाचेस्कूच्या मृत्युच्या १० वर्षांनंतरही रोमानियामध्ये लोक भितीच्या सावलीखाली जगत होते. ते त्यांच्या सावलीला देखील घाबरत होते. त्यांना रस्त्याने चालताना देखील भिती वाटत होती.
बीबीसीनुसार, रोमानियामध्ये लोक चाचेस्कूला 'कंडूकेडर' नावाने ओळखत होते. ज्याचा अर्थ होतो 'नेता'. त्याची पत्नी एलीनाला रोमानियाची राष्ट्रमाता असा किताब देण्यात आला होता. असे म्हणतात की, हुकूमशहाचा मर्जी इतकी होती की, जेव्हा दोन फुटबॉल टीमचा सामना व्हायचा तेव्हा एलीना ठरवत होती की, विजयी कोणती टीम होणार आणि हा सामना टीव्हीवर दाखवायचा की नाही हे सुद्धा ती ठरवत असे.
असे म्हणतात की, चाचेस्कूने देशभरात गर्भपातावर बंदी घातली होती आणि याचा उद्देश हा होता की, देशाची लोकसंख्या वाढावी. जेणेकरून देश एक विश्व शक्ती व्हावा. तसेच त्याने घटस्फोटावर बंदी घातली नव्हती, पण नियम इतके कठोर होते की, घटस्फोट देऊही शकत नव्हते आणि घेऊही शकत नव्हते.
असेही म्हटले जाते की, चाचेस्कूला स्वच्छतेचा आजार होता. तो एका दिवसात २०-२० वेळा त्याचे हात धुवत होत आणि तेही दारूने. त्याला भिती होती की, त्याला इन्फेक्शन होऊ नये. इतकेच काय तर तो १९७९ मध्ये ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांना भेटायला गेला होता, तेव्हाही तो कुणाशीही हात मिळवल्यावर दारूने हात धुवत होता. त्याने बाथरूममध्येच हात धुण्यासाठी दारूच्या बॉटल्स ठेवल्या होत्या.
चाचेस्कूची दहशत इतकी वाढली होती की, रोमानियातील लोकांना व्यवस्थित खायला देखील मिळत नव्हते. पण फळं, भाज्या आणि मांस दुसऱ्या देशांमध्ये निर्यात केलं जात होतं. नंतर याच हुकूमशाही विरोधात लोकांनी आवाज उठवला आणि ठिकठिकाणे आंदोलने केली. या परिणाम हा झाला की, २५ डिसेंबर १९८९ मध्ये चाचेस्कू आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली. कोर्टाने दोघांना मृत्यूदंडाची सिक्षा सुनावली. तेव्हा चाचेस्कूच्या हुकूमशाहीचा अंत झाला.