एक असा किल्ला जेथून दुश्मनांवर केला गेला होता चांदीच्या तोफगोळ्यांनी हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 04:11 PM2021-06-17T16:11:21+5:302021-06-17T16:15:47+5:30
आज तुम्हाला एका अशा किल्ल्याबाबत सांगणार आहोत जो इतिहासात अमर आहे. कारण या किल्ल्यावर जी घटना घडली होती ती जगात कुठेही घडली नाही.
प्राचीन काळात राजे आपल्या राजे आपल्या राज्यातील किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी काहीही करायला तयार असायचे. सोनं आणि चांदीपेक्षाही किल्ल्याला अधिक महत्व दिलं जात होतं. आज तुम्हाला एका अशा किल्ल्याबाबत सांगणार आहोत जो इतिहासात अमर आहे. कारण या किल्ल्यावर जी घटना घडली होती ती जगात कुठेही घडली नाही आणि घडणारही नाही.
आम्ही तुम्हाला सांगतोय चुरू किल्ल्याबाबत. हा किल्ला राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात आहे. १६९४ मध्ये ठाकूर कुशल सिंह यांनी हा किल्ला बांधून घेतला होता. या किल्ल्याच्या निर्माणामागील उद्देश आत्मसुरक्षा आणि सोबत राज्यातील जनतेला सुरक्षा प्रदान करणे हा होता.
हा जगातला एकमेव असा किल्ला आहे जिथे युद्धादरम्यान गोळा बारूद संपल्यावर तोफेतून दुश्मनांवर चांदीच्या गोळ्यांनी हल्ला करण्यात आला होता. ही इतिहासातील फार हैराण करणारी घटना होती. ही घटना होती १८१४ मधील. त्यावेळी किल्ला ठाकूर कुशल सिंह यांचे वंशज ठाकूर शिवजी सिंह यांच्या ताब्यात होता.
इतिहासकारांनुसार ठाकूर शिवजी सिंह यांच्या सेनेत २०० पायदळ आणि २०० घोडेस्वार सैनिक होते. पण युद्धा सेनेची संख्या अचानक वाढत होती. कारण इथे राहणारे लोक राजासाठी काहीही करायला तयार होते. त्यामुळे हे लोक एका सैनिकासारखे दुश्मनांसोबत लढत होते.
केवळ इतकंच नाही तर ठाकूर शिवजी सिंह यांची प्रजा आपल्या राजासाठी आणि राज्याच्या सुरक्षेसाठी आपली संपत्तीही लुटवत होते. १८१४ चा ऑगस्ट महिना होता. बीकानेरचे राजा सूरत सिंह यांनी चुरू किल्ल्यावर हल्ला केला होता. इकडे ठाकूर शिवजी सिंह जोरदार मुकाबला करत होते. पण काही दिवसांनी त्यांच्याकडील गोळा-बारूद संपलं.
युद्ध सुरू असतानाच गोळा-बारूद संपल्याने राजाची चिंता वाढली. मात्र, प्रजेने त्यांना भरपूर साथ दिली आणि राज्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपले सोन्या-चांदीचे दागिने देऊन टाकले. या दागिन्यांपासून तोफ गोळे तयार करण्यात आले. ठाकूर शिवजी सिंह यांनी सैनिकांना आदेश दिले की, दुश्मनांवर तोफांमधून चांदीचे गोळे टाका. याचा परिणाम असा झाला की, दुश्मनांच्या सेनेने हार मानली आणि ते तेथून पळून गेले. ही घटना चुरूच्या इतिहासात अमर आहे.