'या' नवाबाने आवडत्या कुत्रीच्या लग्नावर पाण्यासारखा पैसा केला होता खर्च, किती तो वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 04:26 PM2021-08-16T16:26:56+5:302021-08-16T16:29:32+5:30
कुत्रे पाळण्याचे शौकी जूनागढचे नवाब महाबत खानने साधारण ८०० कुत्री पाळली होती. इतकंच नाही तर या सर्वच कुत्र्यांसाठी वेगवेगळ्या रूम्स, नोकर आणि टेलिफोनची व्यवस्था केली होती.
भारतातील राजे-महाराजे आणि नवाबांची लाइफस्टाईल नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. आपल्या अजब शौकांमुळे राजे-नवाब केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध होते. या लोकांचे शौक आणि त्यासाठी खर्च केल्या जाणाऱ्या पैशांबाबत वाचून कुणीही हैराण होईल.
एका राजाने कचरा फेकण्यासाठी शाही कार रोल्स रॉयस खरेदी केली, तर कुणी डायमंड पेपरवेट म्हणून वापरत होते. याच शौकीनांपैकी एक होते जूनागढचे नवाब महाबत खान. महाबत खानला कुत्र्यांची फार आवड होती.
कुत्रे पाळण्याचे शौकी जूनागढचे नवाब महाबत खानने साधारण ८०० कुत्री पाळली होती. इतकंच नाही तर या सर्वच कुत्र्यांसाठी वेगवेगळ्या रूम्स, नोकर आणि टेलिफोनची व्यवस्था केली होती. जर एखाद्या कुत्राचा जीव गेला तर त्याला रितीरिवाजानुसार कब्रस्तानात दफन केलं जात होतं आणि त्याच्या अंत्ययात्रेत शोक संगीत वाजवलं जात होतं.
नवाब महातब खानला एक कुत्री फार जास्त आवडायची. तिचं नाव होतं रोशना. महातब खानने रोशनाचं लग्न फार धडाक्यात केलं होतं. तिचं लग्न बॉबी नावाच्या कुत्र्यासोबत लावून दिलं होतं. या लग्नात नवाबाच्या आजच्या व्हॅल्यूनुसार साधारण २ कोटींपेक्षाही रूपये खर्च करण्यात आले होते.
नबाव महातब खान यांच्या या शौकाचा उल्लेख प्रख्यात इतिहासकार डॉमिनिक लॉपिअर आणि लॅरी कॉलिन्स यांनी त्यांच्या फ्रीडम एट मिडनाइट पुस्तकात केला होता. रोशनाच्या लग्नावेळी सोन्याचे हार, ब्रेसलेट आणि महागडे कपडे घालण्यात आले होते. इतकंच नाही तर मिलिट्री बॅंडसोबत गार्ड ऑफ ऑनरसोबत २५० कुत्र्यांनी रेल्वे स्टेशनवर त्यांचं स्वागत केलं होतं.
नवाब महाबत खानच्या आवडत्या कुत्रीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक राजे-महाराजे आणि व्हाइसरॉय आले होते. पण व्हाइसरॉयने येण्यास नकार दिला होता. नवाब महाबत खान यांनी आयोजित केलेल्या या लग्नात साधारण दीड लाखांपेक्षा जास्त पाहुणे आले होते.