जागतिक महिला दिन : ९ वर्षाच्या चिमुकलीचा प्रताप, बनवलं सोशल मीडियातील त्रासापासून सुटका करणारं अॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 12:05 PM2020-03-08T12:05:27+5:302020-03-08T12:31:42+5:30

या मुलीनं चक्क सोशल मीडियाच्या त्रासापासून सुटका मिळवून देण्यासाठी ऍप्लिकेशन तयार केलं आहे. 

International women's day : Meaidaibahun majaw create an anti bullying app invited to silicon valley | जागतिक महिला दिन : ९ वर्षाच्या चिमुकलीचा प्रताप, बनवलं सोशल मीडियातील त्रासापासून सुटका करणारं अॅप

जागतिक महिला दिन : ९ वर्षाच्या चिमुकलीचा प्रताप, बनवलं सोशल मीडियातील त्रासापासून सुटका करणारं अॅप

googlenewsNext

(image credit- femina.in)

सोशल मीडियाच्या त्रासाला अनेकांना सामोरं जावं लागतं. त्यात महिलांना अनेकदा गंभीर समस्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. तुम्ही सुद्धा सोशल मीडियाच्या त्रासाला वैतागला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक नऊ वर्षीय मुलीच्या पराक्रमाबद्दल सांगणार आहोत. या मुलीनं चक्क सोशल मीडियाच्या त्रासापासून सुटका मिळवून देण्यासाठी ऍप्लिकेशन तयार केलं आहे. 

म्हणजेचं  सोशल मीडियाच्या माध्यामातून एखाद्याला चिडवणे, पाठलाग करणे, अश्लिल संवाद  करणे या समस्यांचा सामना मुलींना करावा  लागतो.  अनेकदा  हे प्रकार बुलिंगपर्यंत पोहोचतात. त्यामुळे अनेक तरूण मुलं स्वतःला त्रास करून घेत असतात. अनेकांची आयुष्यसुद्धा उधवस्त होतात. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ही संख्या वाढत चालली आहे. 

हैराण करणारी गोष्ट म्हणजे अशा लोकांना पकडणं खूप कठिण असतं. कारण फेक आयडीचा वापर करून अशा प्रकारची कृत्य केली जातात. या समस्या लक्षात घेऊन भारताच्या मेघालय राज्यातील रहिवासी असलेल्या  एका ९ वर्षाच्या मुलीने एंटी-बुलिंग ऍप्लिकेशन तयार केले आहे.  याद्वारे  असा प्रकार करत असलेल्या अकाऊंटधारकाला पकडणं सोपं होईल. 

कमी वयात इतका मोठा आणि गरजेचा असा  शोध लावलेल्या मुलीचं नाव Meaidaibahun Majaw आहे. ही मुलगी शिलाँगच्या शाळेत  चौथीला शिकत आहे. White Hat Junior नावाच्या एका वेब पोर्टल ने या मुलीला अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये तांत्रिक जगतात जगभरातील दिग्गजचांशी चर्चा करण्यासाठी निवडले आहे. या मुलीने सप्टेंबर २०१९ मध्ये ऑनलाईल ऍप्लिकेशन डेवलपमेंट कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. त्यात या मुलीला ऍप्लिकेशन तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. हे शिकून एक एंटी बुलिंग ऍप्लिकेशन या मुलीने तयार केलं आहे. ( हे पण वाचा-'या' परिवाराने तब्बल १४२ वर्षांपासून आजही सांभाळून ठेवलाय 'हा' केक, कारण वाचून व्हाल अवाक्...)

या माध्यामातून एखादया युजरला त्रास देत असलेल्या व्यक्तीचा प्रशासकीय यंत्रणांमार्फत खुलासा केला जाऊ शकतो. यात एक ट्रॅकिंग डिव्हाईस असणार आहे.  त्यामुळे चुकीचा प्रकार सोशल मीडियावर  करत असलेल्या व्यक्तीला पकडलं जाऊ शकतं.  यामध्ये तक्रार करत असलेल्या व्य़क्तीची माहिती गुप्त राहते. नॉर्थ-ईस्टमधिल सगळ्यात कमी वयातील ही मुलगी  सिलिकॉन व्हॅलीमध्ये टेक्निशियन्स आणि इंजिनीअरर्ससमोर आपलं प्रेजेंटेशन देणार आहे. ( हे पण वाचा-गुनाह हैं ये! आइस्क्रीम चाटली म्हणून थेट तुरूंगवासाची शिक्षा, 'इतका' दंडही भरावा लागेल! )

Web Title: International women's day : Meaidaibahun majaw create an anti bullying app invited to silicon valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.