४४ वर्षांच्या 'या' महिलेने आयुष्यातील २७ वर्ष काढली तुरूंगात, तब्बल ६४८ गुन्ह्यांमध्ये दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 01:14 PM2019-07-19T13:14:22+5:302019-07-19T13:18:07+5:30

आर्यलॅंडची जेनिफर आर्मस्ट्रॉंगचे किस्से वाचून तुम्ही हैराण नक्कीच व्हाल. जेनिफरला तब्बल ६४८ प्रकरणांमध्ये कोर्टाने दोषी ठरवलं आहे.

Irelands most prolific petty criminal racks up conviction number 648 | ४४ वर्षांच्या 'या' महिलेने आयुष्यातील २७ वर्ष काढली तुरूंगात, तब्बल ६४८ गुन्ह्यांमध्ये दोषी

४४ वर्षांच्या 'या' महिलेने आयुष्यातील २७ वर्ष काढली तुरूंगात, तब्बल ६४८ गुन्ह्यांमध्ये दोषी

Next

(Image Credit : odditycentral.com)

एखाद्याला चोरी करण्याची सवय लागली असं होऊ शकतं का? म्हणजे असं की, एखाद्याला चोरी करण्यात फारच मजा येत असेल. असंच काहीसं एका महिलेबाबत सांगता येईल. आयरलॅंडच्या जेनिफर आर्मस्ट्रॉंगचे किस्से वाचून तुम्ही हैराण नक्कीच व्हाल. कारण जेनिफरला तब्बल ६४८ प्रकरणांमध्ये कोर्टाने दोषी ठरवलं आहे.

तुरूंगातून सुटल्यावर दुसऱ्याच दिवशी चोरी

जेनिफर काही दिवसांपूर्वी तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिला दारूची बॉटल चोरताना पकडण्यात आले. ही चोरी तिने १६ महिन्यांची शिक्षा पूर्ण करून आल्याच्या दोनच दिवसांनी केली. ४४ वर्षीय महिला जेनिफरवर डल्बिन शहरात चोरीसोबतच अत्याचाराच्या काही तक्रारी आहेत. तिला मारझोड करणे आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याच्या आरोपात अटकही करण्यात आली होती.

न्यायधीशांना म्हणाली होती एक संधी द्या

गेल्यावेळी जेव्हा जेनिफरला न्यायाधीशांसमोर सादर केलं गेलं तेव्हा ती म्हणाली होती की, 'मला सुधरण्याची एक संधी देण्यात यावी'. न्यायाधीशांनी सुद्धा तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिला केवळ ६ महिन्यांची शिक्षा सुनावली होती.

जेनिफरचा वकील काय म्हणाला?

जेनिफर आर्मस्ट्रॉंगच्या वकीलाने कोर्टात सांगितले की, 'माझ्या क्लाइंटचं जीवन फारच दु:खद राहिलं आहे. तिने गरिबी अनुभवली आहे आणि ती ड्रग अ‍ॅडिक्टही होती. एकाचवेळी तिला हिरोईन आणि कोकेनची लत लागली होती. पण जेनिफरने स्वत:ला बदललं आणि दोन्ही सवयी सोडल्या. सध्या ती बेघर आहे आणि जीवन बदलण्याचा प्रयत्न करत आहे'.

यावेळी न्यायाधीशांनी तुरूंगात पाठवलं नाही

जेनिफरला तिच्या ६४८ गुन्ह्यांसाठी शिक्षा झाली आहे. नंतर तिने ६१८ रूपयांची दारूची बॉटल चोरी करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी तिला अटक केली गेली, तेव्हा ती नशेत होती. मात्र, यावेळी न्यायाधीशांनी तिच्यावर दया दाखवत तिला तुरूंगात न पाठवता समाजसेवा करण्याचा दंड ठोठावला आहे.

८८ वेळा चोरी प्रकरणात दोषी

आपल्या ४४ वर्षांच्या जीवनात जेनिफरने २७ वर्ष तुरूंगात घालवले आहेत. ज्या ६४८ गुन्ह्यांसाठी तिला शिक्षा झाली होती, त्यात ८८ गुन्हे चोरीचे आहेत. तर २१६ सार्वजनिक ठिकाणी ड्रग्स घेण्याचे गुन्हे आहेत. 

Web Title: Irelands most prolific petty criminal racks up conviction number 648

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.