पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट पाण्याची असते की बॉटलची? जाणून घ्या सत्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 04:26 PM2024-03-15T16:26:17+5:302024-03-15T16:29:28+5:30
पण मग तरीही पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
Water Bottle: बऱ्याचदा आपण काही खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आधी त्या वस्तूंवरील एक्सपायरी डेट चेक करतो. मगच ती वस्तू खरेदी करतो. आजकाल बरेच लोक आपली तहान भागवण्यासाठी पाण्याची बॉटल विकत घेतात. पण तुम्ही कधी पाण्याच्या बॉटलवरील एक्सपायरी डेट पाहिली का? तशी तर पाण्याची एक्सपायरी डेट नसते. जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण मग तरीही पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
पाणी कधी एक्सपायर होत नसतं
एक्सपर्ट्स सांगतात की, पाण्याला कधीच एक्सपायरी डेट नसते. आपण नळातून येणारं जे पाणी पितो ते अनेक महिने धरणात किंवा तलावात साठवलेलं असतं. त्यामुळे अर्थात पाणी एक्सपायर होत नसतं. पण पाणी स्टोर करण्यासाठी ज्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला जातो त्याची एक्सपायरी डेट नक्कीच असते. याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. असं सांगितलं जातं की, ही एक्सपायरी डेट ग्राहकाला हे दर्शवते की, बंद करण्यात आलेल्या वस्तुची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. बॉटलमधील पाण्याची एक्सपायरी डेट त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी निर्धारित केली जाते.
बॉटलमधील पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षा?
पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते याचं आणखी एक कारण म्हणजे ग्राहकाला सांगता यावं की, बॉटलमध्ये बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. या तारखेनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर प्रभाव पडू शकतो आणि याचं सेवन नुकसानकारक ठरू शकतं.
नळाचं पाणी 6 महिने ठेवू शकतो
हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार, नळाचं पाणी 6 महिन्यांपर्यंत ठेवलं आणि वापरलं जाऊ शकतं. ते कधी खराब होत नाही. सिर्फ कार्बोनेटेड नळाचं पाणी असं असतं ज्याची टेस्ट हळूहळू बदलत जाते. कारण त्यातून गॅस हळूहळू निघून जातो. हवेत असलेलं कार्बन डायऑक्साइड पाण्यात मिक्स झाल्यानंतर ते थोडं अम्लीय होतं. कंटेनर 6 महिने थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागेवर ठेवा. पाण्याची टेस्ट बदलणार नाही.