काही लोकांनी पैसे जमा करून खरेदी केलं आयलॅंड, बनवला नवा देश; पोलिसही आहेत अन् सरकारही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 04:56 PM2022-03-14T16:56:47+5:302022-03-14T17:03:31+5:30

या देशाला आंतरराष्ट्रीय संघटनांची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे याला मायक्रो नेशन म्हटलं जात आहे. क्राउड फंडच्या माध्यमातून हे आयलॅंड विकत घेण्यासाठी पैसे जमा केले गेले.

Island bought made new micro nation coffee caye | काही लोकांनी पैसे जमा करून खरेदी केलं आयलॅंड, बनवला नवा देश; पोलिसही आहेत अन् सरकारही

काही लोकांनी पैसे जमा करून खरेदी केलं आयलॅंड, बनवला नवा देश; पोलिसही आहेत अन् सरकारही

googlenewsNext

बेलिज एक कॅरेबियन देश आहे. या देशाकडे १.२ एकराचे छोटे छोटे आयलॅंड आहेत. हे काही लोकांनी मिळून खरेदी केले आणि आता त्या लोकांना नवा देश तयार केल्याचा दावा केला जात आहे. पण या देशाला आंतरराष्ट्रीय संघटनांची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे याला मायक्रो नेशन म्हटलं जात आहे. क्राउड फंडच्या माध्यमातून हे आयलॅंड विकत घेण्यासाठी पैसे जमा केले गेले.

letsbuyanisland.com वर या आयलॅंडचा भाग विकत घेता येतो आणि तेथील नागरिकताही मिळवता येते. १४ मार्च २०२२ पर्यंत या आयलॅंडच्या गुंतवणुकदारांची संख्या १०३ झाली आहे आणि नागरिकांची संख्या ३५० झाली आहे. या देशाचं अधिकृत नाव Principality Of Islandia आहे. या देशाकडे स्वत:चा राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, सरकार आणि सीक्रेट पोलिसही आहेत. 

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, मार्सल मेअर लेट्स बान अॅन्ड आय़लॅंडचे को-फाउंडर आहेत. त्यांनी आणि त्यांच्या ग्रुपने मिळून Coffee Caye नावाच्या या आयलॅंडसाठी १ कोटी ९० लाख रूपये क्राउडफंडच्या माध्यमातून जमा केले.
तेच याची किंमत १ कोटी ३७ लाख रूपये होती. याची विक्री डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती. तसेच आयलॅंडच्या एका भागाची किंमत आता २ लाख ४८ हजारच्या आसपास ठेवली आहे. याचे आतापर्यंत १०० शेअर विकले गेले आहेत.

मार्शल मेअरने सांगितलं की, आयलॅंड बेलिज सिटीपासून १५ मिनिटांच्या बोट राइड अंतरावर आहे. २०२२ च्या सुरूवातील अनेक गुंतवणूकदार आणि पर्यटक इथे आले. मेअर म्हणाले की, त्या आयलॅंडवर उतरणं ज्यात तुम्ही स्वत: गुंतवणूक केली आहे, हा फार शानदार अनुभव असतो. 

आयलॅंड खरेदी करण्यासाठी क्राउड फंडिंगची आयडिया साधारण १५ वर्षाआधी आली होती. तेव्हा हारेथ जॉनसनने Letsbuyanisland.com चं डोमेन खरेदी केलं होतं. यावेळी टूरमध्ये मेअरसोबत गारेथ नव्हते. गारेथ यंग पायनिअर टूर्सचेही को फाउंडर आहेत. त्यांची कंपनी लोकांना नॉर्थ कोरिया आणि सीरियामध्ये फिरायला नेते. त्यासोबतच अशाही देशात फिरायला नेतात जे देश स्वत: स्वतंत्र असल्याचा दावा करतात. 

जे गुंतवणूकदार Coffee Caye मध्ये पैसे लावतील किंवा फिरायला येतील ते येथील नागरिक बनतील. यासाठी पासपोर्टची गरज पडणार नाही. त्यासोबतच लॉर्ड किंवा लेडी ऑफ आयलॅंडची उपाधीही फार कमी फीमध्ये खरेदी केली जाऊ शकेल. यासाठी गुंतवणूक करण्याची गरज नाही.
 

Web Title: Island bought made new micro nation coffee caye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.