1774 मध्ये लागला होता शोध, आता अचानक गायब झाले 22 किलोमीटर लांबीचे 'आयलंड'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:30 AM2022-01-31T11:30:59+5:302022-01-31T11:31:11+5:30

सर्वात आधी 1774 मध्ये जेम्‍स कुक नावाच्या व्यक्तीने हे आयलंड शोधल्याचा दावा केला होता. पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी असलेल्या या आयलंडला 'सँडी आयलंड' म्हणून ओळखले जाऊ लागले.

island said to be found in 1774, now suddenly disappeared 22 km long 'sandy island' | 1774 मध्ये लागला होता शोध, आता अचानक गायब झाले 22 किलोमीटर लांबीचे 'आयलंड'

1774 मध्ये लागला होता शोध, आता अचानक गायब झाले 22 किलोमीटर लांबीचे 'आयलंड'

googlenewsNext

पृथ्वीवर अनेक अशी रहस्यमई ठिकाणे आहेत, ज्याची आपल्या सर्वांना माहितीदेखील नाही. अनेक वर्षांपूर्वी पृथ्वीवर असलेली अनेक ठिकाणी काळानुरुप बदलली किंवा नष्ट झाली. अशाच प्रकारची एक घटना पॅसिफिक महासागरात घडली आहे. शेकडो वर्षापासून पॅसिफिक महासागरात असलेले एक बेट अचानक गायब झाले आहे.

तुमचाही विश्वास बसणार नाही, पण ही घटना घडली आहे. 1774 मध्ये पहिल्यांदा जेम्स कुक (James Cook)  नावाच्या एका व्यक्तीने पॅसिफिक महासागरातील हे बेट सापडल्याचा दावा केला होता. त्या बेटाला 'सँडी आयलंड' म्हणून ओळखले जाऊ लागले. पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी असल्याचे या आयलंडवर कुणीच राहत नव्हते म्हणून त्याला 'फॅंटम आयलंड' असेही म्हटले गेले. काही दिवसांपूर्वीपर्यंत हे बेट गुगल मॅपवरही दिसत होते. पण नंतर जेव्हा संशोधकांनी हे बेट नसल्याचे उघड केले तेव्हा गुगलनेही ते मॅपवरुन काढून टाकले.

अनेक ठिकाणी बेटांचे पुरावे
ऑस्ट्रेलियाच्या किनार्‍याजवळ पॅसिफिक महासागरात असलेल्या सँडी बेटाचा दावा जेम्स कुकने 1774 साली केला होता. जेम्स कुकने सांगितल्यानुसार, या बेटाची लांबी सुमारे 22 किलोमीटर आणि रुंदी 5 किलोमीटर होती. 1876 ​​मध्ये वेग नावाच्या जहाजानेही सँडी बेट अस्तित्वात असल्याचा दावा केला होता. 19व्या शतकात बिट्रेन आणि जर्मनीच्या नकाशांमध्येही हे बेट असल्याचा दावा करण्यात आला होता.

बेट अस्तित्वात नसल्याचे आढळले
नंतरच्या काळात अनेकांनी या बेटाच्या अस्तित्वावर संशयही व्यक्त केला. फ्रेंच हायड्रोग्राफिक सर्व्हिसने हे बेट 1979 पासून त्याच्या नॉटिकल चार्टमधून काढून टाकले. तर, 22 नोव्हेंबर 2012 रोजी ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांना आढळले की हे बेट अस्तित्वात नाही. यादरम्यान शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी समुद्राची खोली मोजण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान ही खोली 4 हजार 300 फुटांपेक्षा जास्त नसल्याचे आढळून आले. 

Web Title: island said to be found in 1774, now suddenly disappeared 22 km long 'sandy island'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.