ऐकावं ते नवलंच! 'या' महिलेला आहे अंत्यसंस्काराला जाण्याचा छंद; कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 05:11 PM2021-12-06T17:11:37+5:302021-12-06T17:12:26+5:30
Woman loves to visit funerals : एका महिलेला चक्क अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमांना जाण्याची आवड आहे. त्यामुळेच ती महिला आतापर्यंत तब्बल 150 अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला जाऊन आली आहे.
विविध गोष्टींची अनेकांना आवड असते अथवा छंद असतो. पण काहींचे छंद आणि आवड हे जरा हटकेच असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. इंग्लंडमधील एका महिलेला चक्क अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमांना जाण्याची आवड आहे. त्यामुळेच ती महिला आतापर्यंत तब्बल 150 अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला जाऊन आली आहे. लंडनमधील इजलिंग्टन परिसरामध्ये राहणाऱ्या 55 वर्षीय जीन ट्रेंड हिल या अभिनेत्री आहेत. त्यांना कला आणि फोटोग्राफीचीही आवड आहे. मात्र त्याहून धक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांना एका विचित्र गोष्टीमध्ये फार रस आहे.
जीन यांच्या विचित्र छंदामुळे त्या कायम चर्चेत असतात. जीन यांना अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला जायला आवडतं. द सन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यात जीन किमान चार अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावतात.जीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या 14 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या 56 वर्षीय वडिलांचा फुफ्फुसांच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर जीन पूर्णपणे खचल्या होत्या. यामधून सावरत असतानाच सहा वर्षांनी म्हणजेच जीन 20 वर्षांच्या असताना त्यांना मातृशोक झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना जबर धक्का बसला होता.
नातेवाईक अंत्यसंस्कारासंदर्भातील तयारीसाठी संपर्क करू लागले
आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला निरोप देण्यासंदर्भातील तयारी आधीपासूनच करुन ठेवायला हवी असं जीन यांना वाटू लागल्याने त्यांनी आपल्या आईच्या मृत्यूनंतरच्या अंत्यसंस्काराची तयारी आधीच करुन ठेवली होती. आई-वडिलांच्या निधनानंतर जीन यांना त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासंदर्भातील तयारीसाठी संपर्क करू लागले. आपल्या ओळखीचे एवढे लोक आपल्याला सोडून जात असल्याचं पाहून त्यांना दु:ख होतं आहे. यामधूनच सावरण्यासाठी त्या अनोळखी व्यक्तींच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ लगाल्या.
10 वर्षांमध्ये 150 हून अधिक अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला हजेरी
जीन यानंतर हळूहळू स्मशानामध्येच आपला अधिक वेळ घालवू लागल्या. त्या दफनभूमीमध्ये होणाऱ्या अंत्यसंस्कारांची चित्रं काढू लागल्या. त्यांनी मागील 10 वर्षांमध्ये 150 हून अधिक अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली आहे. मी जेव्हा दफनभूमीमध्ये जाते तेव्हा मला माझे आई-बाबा जवळ असल्यासारखं वाटतं, असं जीन यांनी म्हटलं आहे. आपण धार्मिक प्रथांचं फार पालन करतो आणि मृत्यूनंतरही एक जग असून मृत्यू झालेल्या व्यक्ती दुसऱ्या जगात जातात असा आपला विश्वास असल्याचं त्या सांगतात. आता जीन दफनभूमीच्या देखरेखीचं काम करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे.