इथे नागरिकांना कचरा उचलण्यासाठी दिले जातात पैसे, कचरा उचला मालामाल व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:59 PM2021-11-12T12:59:27+5:302021-11-12T12:59:39+5:30
एका अनोख्या स्टार्टअपद्वारे (Israel Unique Start up) लोकांना साफ-सफाईच्या बदल्यात कचरा उचलण्यासाठी व्हर्चुअल मनीची ऑफर (Start up Offers Virtual Clean Coins) दिली जात आहे.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वस्छता अभियानाबाबत अनेक कँपेन संपूर्ण देशभरात राबवत आहेत. याचदरम्यान इज्राइलमध्येही (Israel) स्वस्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. लोकांनी यामध्ये सामिल व्हावं यासाठी विविध ऑफर्सही दिल्या जात आहेत. एका अनोख्या स्टार्टअपद्वारे (Israel Unique Start up) लोकांना साफ-सफाईच्या बदल्यात कचरा उचलण्यासाठी व्हर्चुअल मनीची ऑफर (Start up Offers Virtual Clean Coins) दिली जात आहे.
एका एलिश्या नावाच्या महिलेने 10 बॅग भरुन क्लिन कॉइन नावाच्या App वर याबाबत अपडेट केलं आणि तिला 10 क्लिन कॉइन मिळाले. अशाप्रकारे लोक कचऱ्याच्या पिशव्या डम्पिंगमध्ये नेण्यापूर्वी ते App वर अपडेट करतात आणि क्लिन कॉइन जमा करतात. या व्हर्चुअल मनीचा उपयोग हे लोक सामान खरेदीसाठी करतात.
Clean Coin App चे को-फाउंडर अॅडम रॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते फोटो पाहून ओळखतात की कचरा कुठे आहे आणि त्यासाठी किती बॅग लागतील आणि किती क्रेडिट लागेल. त्यांच्या या App वर आतापर्यंत त्यांच्या देशातील 16000 लोकांनी साइन-अप केलं आहे. यापैकी 1200 लोक दररोज कचरा वेचण्याचं काम करतात आणि त्यातून क्लिन कॉइन जमा करतात.
काय आहे क्लिन कॉइन ?
कचरा उलल्यानंतर जे क्लिन कॉइन मिळतात ते ट्रॅश कलेक्शन रिवॉर्ड व्हाउचर असतात. याद्वारे कपडे, हॉटेलमध्ये राहण्यासाठी इनडोर क्लाइंबिंगसाठी अॅक्टिव्हिटीजमध्ये रिडीम केलं जाऊ शकतो. हळू-हळू सुपरमार्केटही या App शी जोडले जात आहेत. वेस्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने लोकांचा या App मध्ये इंटरेस्ट वाढत आहे. एका अंदाजानुसार, एक इज्रायली नागरिक दररोज 1.7 किलोग्रॅम कचरा जमा करतो. इथे प्लॅस्टिकचा मोठा वापर केला जातो. त्यामुळे हा प्लॅस्टिकचा कचरा पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असून काही प्रमाणात यात कमी आणण्यासाठी असे उपक्रम राबवले जात आहेत.