बाबोss... 18 कॅरेट सोनं, 3600 हिरे; तयार होतोय 11 कोटींचा शाही 'मास्क'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 11:21 AM2020-08-10T11:21:48+5:302020-08-10T11:23:06+5:30

इस्रायलमध्ये दागिने तयार करणाऱ्या एका कंपनीनं जगातील सर्वात महागडा मास्क तयार केल्याचा दावा केला आहे.

Israeli jeweller makes gold coronavirus mask worth 1.5 million dollars | बाबोss... 18 कॅरेट सोनं, 3600 हिरे; तयार होतोय 11 कोटींचा शाही 'मास्क'!

बाबोss... 18 कॅरेट सोनं, 3600 हिरे; तयार होतोय 11 कोटींचा शाही 'मास्क'!

Next

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 2 कोटी 26, 161 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 29 लाख 625 रुग्ण बरे झाले असून मृतांचा आकडा 7 लाख 34,020 वर पोहोचली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व देश लस शोधण्याच्या मागे लागले आहेत. काही देशांनी शोध लावलेली लस अंतिम टप्प्यात आहे, तर रशिया येत्या दोन दिवसांत लसीच्या पेटंटसाठी दावा करणार आहे. कोरोना लसीची किंमतही सामान्यांना परवणारी असेल, असेही सांगण्यात येत आहे. ही लस बाजारात येईलपर्यंत WHOनं दिलेल्या सूचनांचे पालन करणं, हेच आपल्या हातात आहे. त्यासाठी मास्क घालून घराबाहेर पडणे सुरक्षितेचं आहे. त्यामुळे आता बाजारातही मास्कच्या विविध स्टाईल येताना पाहायला मिळत आहेत. त्यात काही हौशी चांदीचा, सोन्याच्या मास्क तयार करत आहे. (world's most expensive COVID-19 mask)

हसीन जहाँनं मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत, म्हणाली... 

IPL 2020 होणार आत्मनिर्भर!; बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' उतरली टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत

इस्रायलमध्ये दागिने तयार करणाऱ्या एका कंपनीनं जगातील सर्वात महागडा मास्क तयार केल्याचा दावा केला आहे. या मास्कची किंमत 1.5 मिलियन डॉलरचा आहे. या मास्कची भारतीय किंमत ही 11 कोटी 23 लाख 31,250 इतकी आहे. सोन्याच्या या मास्कवर हिरेही लावण्यात आले आहेत. या मास्कचा डिझायनर इस्साक लेव्हीनं सांगितलं की,''18 कॅरेट सोन्याचा हा मास्क आहे आणि यावर सफेद व काळे असे एकूण 3600 हिरे आहेत आणि त्यावर N99चा फिल्टरही लावण्यात आला आहे. एका ग्राहकाच्या मागणीवर हा मास्क तयार करण्यात आला आहे.'' (world's most expensive COVID-19 mask)

'Yvel' कंपनीचे मालक लेव्ही यांनी सांगितले की, ''या मास्कसाठी आणखी दोघांनी मागणी केली आहे आणि वर्षाअखेरीस ते तयार होतील. जगातील हा सर्वात महागडा मास्क आहे.'' त्यांनी मास्कच्या मालकाची ओळख सांगितली नाही, परंतु अमेरिकेतील एका चिनी उद्योगतपीनं तो बनवण्यास सांगितल्याची माहिती आहे. या मास्कच्या निमित्तानं कर्मचाऱ्यांना आव्हानात्मक काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे, लेव्ही यांनी सांगितले. (world's most expensive COVID-19 mask)

Web Title: Israeli jeweller makes gold coronavirus mask worth 1.5 million dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.